Private tutoring and computer operators in big trouble due to constant lockdowns.
Private tutoring and computer operators in big trouble due to constant lockdowns.

सततच्या लॉकडाऊन मुळे खाजगी शिकवणी आणि संगणक चालक मोठया संकटात.

Private tutoring and computer operators in big trouble due to constant lockdowns.

अक्षय पेटकर, प्रतीनिधी✒
वडनेर:-  मागील वर्षा पासून कोरोना महामारी मुळे खाजगी शिकवणी वर्ग आणि संगणक केंद्र बंद अवस्थेत आहेत. परिणामी या व्यवसायावर अवलंबून असणारे खाजगी शिकवणी वर्ग आणि संगणक केंद्र चालकावर मोठे संकट आले आहेत. सतत च्या बंद ला समोर जाताना पुढील जीवन कसे जगावे आणि रूम मालकाचे भाडे कुठून द्यावे हा प्रश्न या व्यसायिक मंडळी समोर उभा आहेत. कोरोना काळात सुद्धा बंद असताना सुद्धा रूम मालकाला किरायाचे पूर्ण पैसे द्यावे लागत आहेत. यामुळे घर खर्च चालावावा की व्यवसायाचा रूम किराया द्यावा आणि सोबत लहान मोठे वयक्तिक कर्ज, गाडी कर्ज आणि घर कर्जाचे हप्ते बँक महिन्याचे कपात करत आहेत. मग कोरोना आहेत की सर्व जण्यसामान्य लोकांसाठी राजकारण सुरु आहेत हा प्रश्न जनतेला आहेत.

कोरोनाच्या नावाखाली शिक्षण पूर्ण बंद असून वाढत्या महागाही च्या माध्यमातून खूप मोठी लूटमार सुरु असल्याचे दिसून येत आहेत. सतत होणाऱ्या लॉक डाऊन मुळे सर्व लोक बेरोजगार झाले आहेत कोणाचे हातून नौकरी गेली, सर्व धंदे बंद पडले असे असताना सुद्धा बँकचे वसूल अधिकारी कर्ज वसुली करिता लहान व्यसायिक लोकांना प्रत्येक दिवशी मोठया प्रमाणात त्रास देत आहेत आणि सरकार कडून होणारी महागाही ची मोठी लूटमार कुठं तरी थांवावी नाही तर सर्व सुरु करून जण सामान्य लोकांना चांगले जीवन जगू द्यावे असे मत खाजगी शिकवणी आणि संगणक केंद्र चालक वर्गाचे आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here