समता सैनिक दल कवडघाटची कार्यकारणी जाहीर.
✒ प्रशांत जगताप ✒
हिंगणघाट:- स्थानिक सम्राट बुद्ध विहार,कवडघाट येथे नुकत्याच संपन्न झालेल्या सभेत समता सैनिक दल कवडघाटची कार्यकारणी घोषित करण्यात आली.या सभेचे अध्यक्ष संमता सैनिक दल जिल्हा संघटक अभय कुंभारे तर प्रमुख अतिथी म्हणून समता सैनिक दल तालुका संघटक मनोज थुल,जिल्हा संरक्षण विभाग प्रमुख प्रदीप कांबळे,मार्शल चंदु भगत हे प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी जिल्हा संघटक अभय कुंभारे यांनी कवडघाट शाखेची कार्यकारणी घोषित करून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान केले.
यावेळी कवडघाट शाखा संघटकपदी अंकेश भोंगाडे यांची निवड करण्यात आली तर सहसंघटक म्हणून रणवीर वरके, शाखा बौद्धिक प्रमुख-राहुल पाटील,शाखा निमंत्रक-नितेश शंभरकर, शाखा प्रचारक-योगेश रामटेके, कोशप्रमुख-लोकेश वावरे, सह-कोशप्रमुख-प्रणय रामटेके,प्रसिद्धी प्रमुख-पलाश खोब्रागडे,सुरक्षा प्रमुख-संकेत डोंगरे,सिद्धार्थ गायकवाड, सह-सुरक्षाप्रमुख रोहण मेश्राम यांची निवड करण्यात आली.
तर सदस्य म्हणून अमोल रामटेके, आकाश रामटेके, कुणाल शंभरकर,अश्वघोष गायकवाड, अभि गोडघाटे,रोहण मेश्राम, प्रतिक मेश्राम, रवी कळसकर,नयन वरके, पियुष खोब्रागडे, आयुष खोब्रागडे, राहुल पाटील, संकेत डोंगरे,लोकेश वावरे, नितेश शंभरकर, प्रकाश नंदागवळी,अविनाश भोंगाडे आदी पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.शेवटी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना आंबेडकरी आंदोलनाच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबद्धतेची शपथ देण्यात आली.