नागपुरच्या तरुणीवर सामूहिक बलात्कार; लग्नाच्या नावाखाली नागपूरच्या तरुणीची जळगावात विक्री.

55

नागपुरच्या तरुणीवर सामूहिक बलात्कार; लग्नाच्या नावाखाली नागपूरच्या तरुणीची जळगावात विक्री.

Gang rape of a young woman in Nagpur; Sale of a young woman from Nagpur in Jalgaon under the name of marriage.

✒️युवराज मेश्राम नागपुर प्रतिनिधी✒️
नागपूर,दि.24 मार्च:- नागपूरातुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नागपुर जिल्हातील भांडेवाडी पारडी परीसरातील एका तरुणीचे लग्न जुडवुन देण्याच्या नावाखाली भंडारा जिल्ह्यातील दलालांनी तिला जळगाव जिल्ह्यात दीड लाखात विकले. तिला विकत घेणाऱ्या कुटुंबातील दोन मुले आणि बापाने या तरुणीवर तब्बल 1 महीना सामूहिक अत्याचार केला. या संतापजनक घटनेचा मंगळवारी उलगडा झाला असून पारडी पोलिसांनी या प्रकरणात दलालांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

पीडित तरुणी 23 वर्षाची असून ती नागपुर जिल्हातील भांडेवाडी परीसरात राहते. तरुणीच्या घरची आर्थिक स्थिती गरीबीची आहे. भंडारा जिल्ह्यातील साकोली, तुमसर आणि देवरी येथील तीन दलालांनी जानेवारी महिन्यात पीडित तरुणीच्या पालकांशी संपर्क साधला. श्रीमंत कुटुंबात मुलीचे लग्न लावून देतो, अशी थाप मारून या भामट्यांनी मुलीला जळगाव जिल्ह्यातील पारोडा येथे नेले. तेथे 3 फेब्रुवारीला पाटील परिवाराला एक लाख 60 हजार रुपयात तरुणीला विकले. त्याचवेळी तिचे 27 वर्षीय जगदीश सुका पाटील याच्याशी लग्न लावून दिले. लग्नाच्या चार-पाच दिवसानंतर रात्री सदर तरुणी झोपून असताना नवरा उठून गेला आणि तिचा दीर तिच्याजवळ आला. त्याने तिच्यावर बलात्कार केला. दुसऱ्या दिवशी तिने ही बाब नवऱ्याला सांगितली असता त्याने ‘हरकत नाही’ म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर पुढचे चार-पाच दिवस पंकज नामक दीर तिचा विरोध मोडून काढत रोज बलात्कार करू लागला. या घटनेच्या दोन तीन दिवसानंतर तिला दुसरा जबर धक्का बसला. तिचा सासरा रात्रीच्या वेळेस तिच्याकडे आला आणि त्याने तिच्यावर बलात्कार केला. या घटनेमुळे तरुणी हादरली. तिने आपल्या सासूला हा प्रकार सांगितला असता तिने काही होत नाही, असे म्हणत तिच्याकडे लक्ष दिले नाही. यानंतर या प्रकाराची बाहेर वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन आरोपींनी तरुणीचा छळ करणे सुरु केले. तिला डांबून ठेवणे, पुरेसे जेवण न देणे, असाही प्रकार रोज सुरू झाला.

2 मार्चला तरुणीने संधी साधून वडिलांना फोन केला. यावेळी तिला तिच्या भावना अनावर झाल्या होत्या. तुम्ही माझे लग्न किती लोकांसोबत लावून दिले, असा सवाल करत तिने आपली कर्मकथा पित्याला ऐकवली. ती ऐकून तरुणीचे वडील लगेच टेहू जि. जळगाव ला पोहोचले. त्यांनी आपल्या मुलीला सोबत नेण्याची तयारी केली असता आरोपी पाटील बापलेकांनी आधी आमचे एक लाख 60 हजार रुपये परत करा नंतर मुलीला न्या, असे म्हणत धमकावणे सुरू केले. मुलीच्या वडिलांनी गावकऱ्यांना हा गैरप्रकार सांगितला. पापाचा बोभाटा होत असल्याचे पाहून आरोपी नमले. त्याच दिवशी 4 मार्च त्यांनी पारोळा जि. जळगाव पोलीस ठाण्यात मुलीसह जाऊन या अत्याचाराची तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपी जगदीश सुका पाटील, पंकज सुका पाटील आणि सुका सदा पाटील सर्व रा. टेहू, ता. पारोळा, जि. जळगाव यांच्याविरुद्ध बलात्कार करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. त्यानंतर पीडित तरुणी आपल्या वडिलांसोबत नागपुरात परतली.