मुंबईसाठी एक आनंदाची बातमी, मुंबईत क्षयरोगाच्या रुग्णांमध्ये 29 टक्क्यांने झाली घट
मल्टी ड्रग रेझिस्टन्स, महानगर पालिकेचा अहवाल
✒निलम खरात प्रतिनिधी✒
मुंबई,दि.24 मार्च:– माघिल अनेक महिन्यापासुन कोरोना वायरसच्या महामारीने मुंबई आणि आजूबाजूचा परीसरात लॉकडाउन आणि संचारबंदी मुळे लोक हवालदिल झाले आहे. कोरोना वायरसचा वाढता आलेख बघता अजुन काही महीने मुंबईला त्रासात जाणार आहे असे चित्र दिसून येत आहे. मात्र, मुंबईकरांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. कारण, मुंबईत गेल्या वर्षभरात क्षयरोगग्रस्तांच्या टीबी रुग्ण संख्येत कमालीची घट झाल्याची माहिती समोर येत आहे. 2019 च्या तुलनेत मागील वर्षी म्हणजे 2020 मध्ये मल्टीड्रग प्रतिरोध क्षयरुग्णांमध्ये 23 टक्क्यांनी घट झाली आहे. एमडीआर म्हणजेच मल्टी ड्रग रेझिस्टन्स. या क्षयरुग्णांची संख्या 2019 मध्ये 5 हजार 673 इतकी होती. तर, 2020 मध्ये हीच संख्या 4 हजार 367 पर्यंत कमी झाली आहे. जागतिक क्षयरोग दिनाच्या निमित्ताने मुंबई महा नगर पालिकेने ही आकडेवारी जाहिर केली आहे.
2019 मध्ये सुमारे 60 हजार 579 मुंबईतील नागरीकांचे क्षयरोगाचे निदान झाले होते, जे 2020 मध्ये 43 हजार 464 पर्यंत खाली आले आहे.त्याचप्रमाणे, मल्टी ड्रग रेझिस्टन्स क्षयात देखील घट नोंदवली असून 4 हजार 673 च्या तुलनेत 4 हजार, 367 पर्यंत घट नोंदविली गेली आहे.
कोरोना काळात लॉकडाउन झाल्यामुळे रुग्ण शोधण्याच्या कामात अडथळे निर्माण झाले होते. पण, ती मोहिमही अनलॉकनंतर तात्काळ सुरू केली. मुंबई महापालिकेने क्षयरुग्णांपर्यंत पोहोचून त्यांना लागणारी औषधं देण्याचे काम केले ज्याच्यामुळे, त्यांच्याकडे दुर्लक्ष झाले नाही.
“ कोविड -19 च्या उद्रेकानंतर काही प्रमाणात नवीन रुग्ण शोधण्याच्या मोहिमेत खंड पडला. तरीही मुंबई जिल्हा क्षय नियंत्रण सोसायटीने 43 हजार 464 लोकांचे निदान केले. विशेष उपक्रमाअंतर्गत दूरध्वनीद्वारे पाठपुरावा करणे, टेलि-कन्सल्टेशन, डिसेंबर महिन्यात सक्रिय रुग्ण शोधणे या सर्वामुळे किमान क्षय रुग्णांपर्यंत पोहोचणे शक्य झाले. डिसेंबर महिन्यात 505 सक्रिय रुग्ण सापडले. घरोघरी जाऊन रुग्णांना औषध पुरवण्याचे काम ही आरोग्य कर्मचाऱ्यांनी केले आहे.