परभणी जिल्ह्यात ऊसतोड 20 वर्षीय मजूर महिलेवर बलात्कार.

42

परभणी जिल्ह्यात ऊसतोड 20 वर्षीय मजूर महिलेवर बलात्कार.

A 20-year-old laborer was raped in Parbhani district.

✒️परभणी जिल्हा प्रातिनिधी✒️
परभणी,दि 24 मार्च:- देशात आणि महाराष्ट्रात आज मोठ्या प्रमाणात महिलांवर अत्याचाराच्या घटनेत वाढ झाली आहे. अशीच एक घटना परभणी जिल्हातुन समोर आली आहे.

परभणी जिल्ह्यातील गंगाखेड पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात घडली आहे. पूर्णा तालुक्यातील देऊळगाव दुधाटे येथे ऊसतोडणीचे काम करणाऱ्या एका 20 वर्षीय मजूर महिलेवर एका नराधमांने अतिप्रसंग केल्याची घटना रविवारी रात्री 11 वाजता घडली. या प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात मंगळवारी त्या आरोपीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देऊळगाव दुधाटे येथे शेतामध्ये काम करणारी ऊसतोडणीस असलेली 20 वर्षीय मजूर महिला याच गावातील रहिवासी आहे. बळीराजा साखर कारखान्यामध्ये तिचा नवरा व फिर्यादी महिला ऊसतोडणीचे काम करतात. रविवारी दिवसभर देऊळगाव दुधाटे गाव शिवारामध्ये ऊसतोडणीचे काम करून गाडी भरून दिल्यानंतर महिला घरी आली. सायंकाळी सात वाजता तिच्या घरात भाकरीसाठी पीठ नव्हते. नवऱ्याला सांगितले की, तुम्ही दळण करून घेऊन या. त्यामुळे नवरा साडेसात वाजता दळण करून आणण्यासाठी गावात गेला. रात्री उशिरापर्यंत आलाच नाही. त्यामुळे सदर पीडित महिलेने घरातील तांदूळ भात करून खाऊन घरांमध्ये झोपली.

तेव्हा आरोपी प्रल्हाद दुधाटे हा त्या महिलेच्या घरात घुसून सदर महिलेचे तोंड दाबून तिच्यासोबत बळजबरीने तिच्या इच्छेविरुद्ध अतिप्रसंग केला. सदर घटना तिने शेजारी राहत असलेल्यांना सांगितली. नवरा घरी आल्यानंतर पतीला घेऊन तिने सासू-सासरेच्या कानावर हा विषय घातला. त्यानंतर मंगळवारी गंगाखेड पोलीस ठाणे गाठून गंगाखेड पोलीस ठाण्यात रितसर फिर्याद नोंदविली आहे. पुढील तपास पोलिस कर्मचारी करत आहे.