ग्रा. पं बेटाळा “बनावट भोगवटा प्रमाणपत्रा” द्वारे शासनाची दिशाभूल.
उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रपूर यांचे गट विकास अधिकारी ब्रम्हपुरी यांना कार्यवाही चे निर्देश.
ब्रम्हपुरी (ता. प्र.):- यंग इंजिनिअर एज्यू. सोसायटी कुरखेडा अंतर्गत महाराष्ट्र इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी डी फार्म व बी फार्म कॉलेज बेटाळा येथील संस्थेचे पदाधिकारी व दोन्ही कॉलेजचे तत्कालीन प्राचार्य आणी तत्कालीन सरपंच यांचेवर “बनावट भोगवटा प्रमाणपत्र” प्रकरणा बाबत गुन्हा नोंदविन्या करिता प्रकरण पंचायत समिती ब्रम्हपुरी येथे संथगतीने चालू होते.पण निवेदनकर्त्यांनी उच्च अधिकाऱ्यांना संबंधित प्रकरणात न्यायिक मागणी साठी संपूर्ण कागदपत्रासह पाठपुरवठा केला असता मा उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रपूर यांनी कायदेशीर कार्यवाही करून तात्काळ अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
संबंधित कॉलेजने सत्र 2017-18 मध्ये पुनःमान्यतेसाठी वापरलेले भोगवटा प्रमाणपत्र बनावट असल्याचे गटविकास अधिकारी कार्यालय ब्रम्हपुरी यांच्या 20/02/2020 च्या पत्रान्वये निवेदकांना कळविण्यात आले आहे यावरून सदर प्रमाणपत्र बनावट असल्याचे स्पष्ट होते. यामुळे गट विकासअधिकारी यांच्या पत्रान्वये सरपंच, तत्कालीन सचिव व विद्यमान सचिव ग्रामपंचायत बेटाळा यांना संबंधितावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याबाबत पत्राद्वारे कळविले असता तत्कालीन सरपंच विद्या विलास मेश्राम यांनी एज्यू.सोसायटीचे अध्यक्ष देवेंद्र मुऱ्हारी पिसे यांच्या विरोधात पो. स्टे. ब्रम्हपुरी येथे दि.07/03/2020 रोजी तक्रार दाखल केली मात्र आपल्याच तक्रारीच्या विसंगत बयान देऊन सदर बनावट भोगवटा प्रमाणपत्रावर माझीच स्वाक्षरी आहे असे लेखी मान्य केले.
परंतु शासन निर्णय 14-07-2015 महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश च्या अधिसूचनेनुसार भोगवटा प्रमाणपत्र बनवणे सरपंच पदात असलेल्या व्यक्तीच्या अधिकार क्षेत्रात येत नसतांना सम्बधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दोषींवर कुठल्याही प्रकारची कायदेशीर कार्यवाही केलेली नाही व पाठराखण केल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे उपरोक्त कारवाई पूर्ण करणे बाबत गट विकास अधिकारी ब्रम्हपुरी यांना दि.31/08/2020 अन्वये पुनःच्छ निवेदन देण्यात आले असता,निवेदनाला 200 दिवसाचा कालावधी लोटूनही गट विकास अधिकारी यांनी दोषी विरोधातील कार्यवाही प्रलंबित ठेवले असल्याचे निदर्शनास येते मात्र उप मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांचे दि.01/03/2020 च्या गट विकास अधिकारी ब्रम्हपुरी यांना दिलेल्या पत्रान्वये संबंधित प्रकरणातील दोषीवर कायदेशीर कार्यवाही करून अहवाल अर्जदारास व कार्यालयात सादर करावा असे निर्देश लागलीच दिले असल्याने संबंधित प्रकरणात शासनाची दिशाभूल करणाऱ्यांचे धाबे दानाणले आहेत.
प्रतिक्रिया
या अगोदर ही श्री देवेंद्र मुऱ्हारी पिसे यांच्या वर फसवणूकीचे गुन्हे दाखल असून, शासनाची दिशाभूल करणाऱ्यांची सत्यता सर्वसामान्यापर्यंत यायला पाहिजे आणी शिक्षा व्हायलाच पाहिजे.
निवेदनकर्ते – रघुवीर सोमाजी बावनकुळे
प्रतिक्रिया
तक्रारदार हा आमच्या संस्थांमध्ये प्राचार्य म्हनुन कार्यरत होते.त्यांना आमच्या संस्थेने पदा वरून काढण्यात आले.त्यामुळे काही तरी तक्रारी करत असतात हे सर्व आरोप खोटे आहेत.देष्यभावनेतु करण्यात आले आरोप आहेत
देवेंद्र पिसे
संस्थापक. महाराष्ट्र इन्सि्टुटयुड ऑफ फार्मसी डी फार्म व बी फॉर्म कॉलेज बेटाळा