दारूमुक्ती आंदोलनाच्या वतीने वडनेर पोलीस स्टेशनच्या ठाणेदाराना निवेदन.
दारूमुक्ती आंदोलनाच्या वतीने वडनेर पोलीस स्टेशनच्या ठाणेदाराना निवेदन.

दारूमुक्ती आंदोलनाच्या वतीने वडनेर पोलीस स्टेशनच्या ठाणेदाराना निवेदन.

दारूमुक्ती आंदोलनाच्या वतीने वडनेर पोलीस स्टेशनच्या ठाणेदाराना निवेदन.

✒प्रा. अक्षय पेटकर प्रतिनिधी✒
वडनेर,दि.27 मार्च:- वर्धा जिल्हात माघील अनेक वर्षा पासून शासनाने संपुर्ण दारू बंदी जाहिर केली आहे. पण आज वर्धा जिल्हातील हिंगणघाट तालुक्यातील वडनेर परीक्षेत्रात मोठ्या प्रमाणात अवैध देशी, विदेशी आणि गावठी मोहाची दारूची विक्री होत असल्याचे समोर येत आहे. त्यांमुळे वडनेर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राजेंद्र शेटे यांना दारू मुक्ती आंदोलनाच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले.

राहुल दुरतकर तालुका संघटक दारू मुक्ती आंदोलन तालुका हिंगणघाट, सचिन महाजन संघटक वडणेर सर्कल अध्यक्ष, विकास तिजारे यांच्या प्रमुख उपस्थितीत वडनेर पोलीस स्टेशनचे निरीक्षक यांना पंचवीस  युवक -युवतींच्या साक्षी हे निवेदन देण्यात आले. ते जिल्हाधिकारी वर्धा श्रीमती प्रेरणा देशभ्रतार यांना जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांना तसेच तहसीलदार मुंदडा हिंगणघाट तहसील यांना याची पत पाठवण्यात आली यामध्ये प्रामुख्याने होळीच्या इतिहास या दरम्यान गावोगाव दारूची फार मोठी विक्री होत असते ती संपूर्णपणे ताबडतोब बंद करण्यात यावी तसेच संपूर्ण 31 मार्चपूर्वी 2021 पूर्वी संपूर्ण वर्धा जिल्ह्यातील अवैध दारू विक्री आहे. ती बंद करण्यात यावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला.

वर्धा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दारू पिणारे लोक आहेत प्रत्येक जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली व्यसनमुक्ती कार्य समितीच्या कृती समिती आहेत परंतु ह्या वर्धा जिल्ह्यामध्ये या समित्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असून राज्य स्थापन करण्यात आल्या नाहीत त्याच्या स्थापन करण्यात याव्यात त्याच्यामध्ये अशासकीय सदस्य त्यांची ताप तो पालकमंत्र्याकडून निवड करून घ्यावी आणि त्याची समिती घेऊन या सर्व जिल्ह्यातल्या दोनशे ते तीनशे शासकीय सदस्यांना लोकांना मान्यवरांना शासकीय अधिकाऱ्यांच्या व्यसनमुक्तीचे कार्य काम करण्याचं काम करण्याची संधी देण्यात यावी असेही या निवेदनात नमूद करण्यात आलेला आहे या समित्यांचे गठन शासकीय अशासकीय सदस्य त्यांनी ताबडतोब दर महिन्याला दोन महिन्याला एक मीटिंग घ्यायला पाहिजे परंतु वर्धा जिल्ह्यामध्ये ना जिल्हाधिकारी घेतल्यास किंवा तहसीलदार यांनी सुद्धा अशा बैठकी घेतल्या नाहीत तर त्या बैठकीत व्हाव्यात आणि संपूर्ण वर्धा जिल्हा 1974 मध्ये गांधी जिल्हा म्हणून तिथे दारूबंदी करण्यात आलेले आहेत परंतु या निवेदनामध्ये असे आम्ही नमूद करतो की प्रत्येक गावांमध्ये अवैध दारू विक्री आहे ही प्रशासन येथे शासन जिल्हाधिकारी पोलिस प्रशासन हे सर्व असतानाही कशी लागते काय कारण याच्या मागची ते शोधून संपूर्ण करण्यात यावे अन्यथा दारू मुक्ती आंदोलनाच्या वतीने पूर्ण जिल्हाभर आंदोलन करण्याचा इशारा या निवेदनामध्ये देण्यात आलेला आहे, दारूमक्ती आंदोलनाचे महाराष्ट्र संयोजक भाई रजनीकांत यांनी स्त्री पुरुष युवक युवतीच्या, युवा प्रेरणा विद्यार्थी सेवा संस्था वडणेर येथे झालेल्या बैठकीला मागदर्शन केले,विद्यार्थी, डॉ. रवींद्र बोरकर, आरती बोरकर, विभा गुरुनूले, मीनल जारोंडे, मीनाक्षी महाजन, प्रांजली महाजन, सुदर्शन झिले, विनय कुंभलकर, स्नेहल चांदेकर, रुपाली चरडे, उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here