स्मार्ट ग्राम स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा - रमाकांत लोधे
स्मार्ट ग्राम स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा - रमाकांत लोधे

स्मार्ट ग्राम स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा – रमाकांत लोधे.

स्मार्ट ग्राम स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा - रमाकांत लोधे

मुकेश शेंडे, सिंदेवाही तालुका प्रतिनिधि✒
सिंदेवाही:- शनिवार ला ग्राम पंचायत कार्यालय वाकल यांचे वतीने 10 टक्के महिला व बालकल्याण  स्वनिधी अंतर्गत अंगणवाडीला साहित्य वाटप, 15 टक्के मागास कल्याण स्वनिधी अंतर्गत बसण्याचे ओटे वितरण त्याच प्रमाणे वित्त आयोगा अंतर्गत अंगणवाडी विध्यार्थ्यांना गणवेश व किट चे वितरण करण्यात आले व पोषण पंधरवडा साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमा प्रसंगी उदघाटक म्हणून रमाकांत भाऊ लोधे जि.प.सदस्य हे होते तर अध्यक्ष म्हणून राहुल सिद्धार्थ पंचभाई सरपंच ग्रा.पं.वाकल हे होते. त्याच प्रमाणे प्रमुख पाहुणे म्हणून नाकतोडे साहेब विस्तार अधिकारी पं.स.सिंदेवाही, बारेकर साहेब अध्यक्ष आदीम माना समाज, दिनेश मांदाडे उपसरपंच ग्रा.पं.वाकल, सिद्धार्थ पंचभाई माजी सरपंच वाकल, मंगेश मेश्राम ग्रा.पं.सदस्य रत्नापुर, लतीफ फारुखी पत्रकार सिंदेवाही, राहुल चिमलवार ग्रा.पं.सदस्य वाकल, सौ.नंदा पटवाळु भोयर ग्रा.पं.सदस्य वाकल, सविता राजेंद्र कोकोडे ग्रा.पं.सदस्य वाकल, मंगला ज्ञानेश्वर गावतुरे ग्रा.पं.सदस्य वाकल, नीलिमा रुपेश पोपटे ग्रा.पं.सदस्य वाकल, चौधरी म्याडम अंगणवाडी पर्यवेक्षिका, बारेकर ग्रामसेवक ग्रा.पं.वाकल, पितांबर नागदेवते सामाजिक कार्यकर्ते वाकल, विलास भेंडारे माजी उपसरपंच वाकल, मारोतराव गुरनुले माजी उपसरपंच वाकल, योगेश सत्तरवार माजी ग्रा.पं.सदस्य, भगवान कोटरंगे माजी ग्रा.पं.सदस्य वाकल, हरिश्चंद्र मांदाडे अध्यक्ष गुरुदेव सेवा मंडळ वाकल, सौ.उषा कावळे अंगणवाडी सेविका वाकल, सौ वंदना कावळे अंगणवाडी सेविका वाकल, सौ.शीला पितांबर नागदेवते आशा कार्यकर्ती वाकल, नरेंद्र मांदाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमा दरम्यान अंगणवाडी साहित्य वाटप तसेच अंगणवाडी विध्यार्थ्यांना गणवेश वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच ग्रा.पं. वाकल ला उत्कृष्ट सेवा देऊन गाव विकासाला चालना दिल्या बद्धल ग्रा.पं.वाकल तर्फे मा.नाकतोडे साहेब पंचायत विस्तार अधिकारी पं.स.सिंदेवाही यांचा शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

त्याच प्रमाणे कोरोना काळात व सध्यास्थितीत कोरोना योद्धा म्हणून उत्कृष्ट कामगिरी केल्या बद्धल मा.सौ. शीला पितांबर नागदेवते आशा कार्यकर्ती वाकल यांचा उदघाटक मा.रमाकांत भाऊ लोधे यांचे हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

सदर कार्यक्रमा प्रसंगी बोलतांना मा.रमाकांत भाऊ लोधे यांनी सांगितले की ग्रा.पं.ने शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे त्याच प्रमाणे स्मार्ट ग्राम स्पर्धेत सहभागी होऊन गावाचा विकास साधावा असे सांगितले. ह्या कार्यक्रमाचे संचालन मा.सागर गेडाम ह्यांनी केल तर प्रास्ताविक मा.दिनेश मांदाडे उपसरपंच वाकल यांनी केलं व आभार बारेकर ग्रामसेवक ग्रा.पं.वाकल यांनी मानलं कार्यक्रम यशस्वीतते साठी वामन कोकोडे ग्रा.पं.कर्मचारी, जगदीश कोकोडे पा.पु.कर्मचारी, रमेश मेश्राम रोजगार सेवक, श्रीकांत भेंडारे, अतुल तालेवार, सौ.अमोल नागदेवते अंगणवाडी मदतनीस, सौ. तनुजा मांदाडे अंगणवाडी मदतनीस यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here