समुद्रपूर तालुक्यात रंगपंचमीच्या दिवसी भीषण बाईक अपघात; 2 मृत्य 1 जखमी.

58

समुद्रपूर तालुक्यात रंगपंचमीच्या दिवसी भीषण बाईक अपघात; 2 मृत्य 1 जखमी.

समुद्रपूर तालुक्यात रंगपंचमीच्या दिवसी भीषण बाईक अपघात; 2 मृत्य 1 जखमी.

✒️आशीष अंबादे प्रतिनिधि✒️
वर्धा/समुद्रपुर,दि.30 मार्च:- समुद्रपुर तालुक्यात दुचाकीच्या समोरासमोर धडक होऊन भिषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. त्यात दोन दुचाकीस्वाराचा मृत्यु आणि एक गंभीर जखमी झाला आहे.

समुद्रपूर – वायगाव गोंड रोडवर दुचाकीच्या समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोघजण जागीच ठार झाले. तर दुचाकी चालकाचा सहकारी यात जखमी झाला आहे. ही घटना काल रंगपंचमीच्या दिवशी सकाळी 11 वाजताच्या सुमारास घडली आहे.

प्राप्त माहितीनुसार दुचाकीने सतीश भोयर वय 40 वर्ष हा वायगाव गोंड वरून समुद्रपूरकडे येत होता. तर हिवरा येथील प्रदीप कुंभारे वय 40 आणि सहकारी शुभम बहादूरे हे दोघे एम एच 32सी झेड 2774 क्रमांकाच्या दुचाकीने समुद्रपूर वरून अंतसंस्काराचे साहित्य खरेदी करून राळेगाव मार्ग हिवऱ्याला जातं होते. दरम्यान वायगाव गोंड रस्त्यावर श्री गायकवाड यांच्या शेताजवळ दोन्ही दुचाकीची समोरासमोर धडक झाली. यात सतीश भोयर आणि प्रदीप कुंभारे यांचा जागीच मृत्यू झाला. तर प्रदीप कुंभारे यांचा सहकारी शुभम बहादुरे गंभीर जखमी झाला.