नापिकीमुळे ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे, त्यांना 1 लाखाची मदत घोषित.
नापिकीमुळे ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे, त्यांना 1 लाखाची मदत घोषित.

नापिकीमुळे ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे, त्यांना 1 लाखाची मदत घोषित.

चंद्रपूर जिल्ह्यातील 15 शेतकरी आत्महत्या प्रकरणे पात्र.

नापिकीमुळे ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे, त्यांना 1 लाखाची मदत घोषित.

मनोज खोब्रागडे
चंद्रपूर / गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी 
चंद्रपूर :- सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की ,सतत च्या नापिकी,मुळे आणि कर्जबाजारीपणा व कर्जपरतफेडीचा तगादा या कारणास्तव चंद्रपूर जिल्ह्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना शासकीय मदत देण्यासाठी जिल्ह्यातील एकूण 15 प्रकरणे पात्र ठरविण्यात आली असून त्यांचे कुटूंबाला प्रत्येक प्रकरणी एक लक्ष रुपये सानुग्रह मदत त्वरीत देण्यात येणार आहे.

प्रकरणात कोरपना तालुक्यातील निमणी येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी मंगेश तिखट, कोठोडा बु. येथील मोतीराम तोडासे, राजुरा तालुक्यातील पांढरपौनी येथील प्रभाकर वैद्य, विरूर स्टे. येथील गुलाब गोहणे व सुरेश दोरखंडे, पाचगाव येथील शंकर बोरकुटे, टेकामांडवा येथील विक्रम सोडनर, नागभिड तालुक्यातील मोहाडी येथील बळीराम शेंडे, चंद्रपूर तालुक्यातील दाताळा येथील महादेव येलमुले, ब्रम्हपुरी तालुक्यातील हळदा येथील जिवन उंदीरवाडे व जगन्नाथ राऊत, गणेशपूर येथील अनिल गुरनुले, सौन्द्री येथील नंदकिशोर राऊत, चिंचोली बुज. येथील नामदेव ढोरे, वरोरा तालुक्यातील राजू जेवुरकर यांच्या प्रकरणांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here