महावितरणच्या हलगर्जीपणामुळे वाढोना सावळी खुर्द येथील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान.

54

महावितरणच्या हलगर्जीपणामुळे वाढोना सावळी खुर्द येथील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान.

महावितरणच्या हलगर्जीपणामुळे वाढोना सावळी खुर्द येथील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान.

युवराज मेश्राम 
नागपुर जिल्हा प्रतीनिधी
कळमेश्वर,दि. 30 मार्च:- तालुक्यातील मोहपा सब सेंटर अंतर्गत असलेल्या सावळी खुर्द वाढवणा खुर्द येथील शेतकऱ्यांच्या शेतात दिनांक 22  ला पाऊस व वादळामुळे शेतकऱ्याच्या शेतातील विद्युत पोल व जिवंत तार खाली पडल्याने अनेकांचे प्राण वाचण्यात आले यात कोणत्याही प्रकारची कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही. येथील मुरलीधर बारई, कृष्णा बारई, पंकज राऊत यांच्या यांच्या शेतातील विद्युत खांब पडल्यामुळे व तारा तुटल्यामुळे लाखो रुपयाचे नुकसान झाल्याचे दिसत आहे. यामुळे सावडी ग्रामपंचायत मध्ये महावितरण पुस्तिका नसल्यामुळे शेतकऱ्यांनी फोनवरून उपकार्यकारी अभियंता राणे साहेब व उपअभियंता वासनिक यांना वारंवार सांगून सुद्धा अजून पर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित असल्यामुळे शेतकऱ्यांचे संत्रा मोसंबी गहू व भाजीपाला या पिकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे महावितरणच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचे दिसत आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन महावितरणच्या हलगर्जीपणामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान नुकसान भरपाई देण्यात यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे शेतातील ओलित करणे गरजेचे आहे. परंतु विद्युत् पुरवठा बंद असल्यामुळे व महावितरणाच्या हलगर्जीपणामुळे ओलिताचे काम थंडबस्त्यात थांबलेले आहे. तरी याकडे लक्ष देऊन त्वरित वीजपुरवठा पूर्ववत करण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.