राळेगाव तालुक्यातील युवा शेतकऱ्याची आत्महत्या.
✒साहिल महाजन यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी✒
यवतमाळ/राळेगाव,दि.1 एप्रिल:- यवतमाळ जिल्हातील राळेगाव तालुक्यातील पिंपळापूर येथे एका युवा शेतक-याने शेतात गळाफास लाऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.
प्राप्त माहितीनुसार राळेगाव तालुक्यातील पिंपळापूर येथील युवा शेतकरी निखिल ज्ञानेश्वर म्हले वय 32 वर्ष याने नारायण बरडे यांच्या शेतात असलेल्या खैराच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्देवि घटना 31मार्च रोजी उघडकीस आली आहे.
पिंपळापूर येथील पोलीस पाटील, सरपंच रवी चौधरी हरीश नाहते यांनी वडकी पोलिसांना या घटनेची माहिती दिली असून घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिस चमु घटनास्थळी दाखल झाले पंचनामा करून मृत्यूदेह उर्वरित शवविछेदनासाठी राळेगाव येथील आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला आहे. पुढील करवाई वडकी पोलिस करित आहे.