छत्रपतींच्या त्याग-सेवा-पराक्रम या त्रिसूत्रीचा संकल्प करा- आ. सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन.
शिवजन्मोत्सवाचे औचित्य साधून चंद्रपुरात भगवा ध्वजाचे लोकार्पण
✒मनोज खोब्रागडे✒
चंद्रपूर / गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर:- छत्रपती शिवाजी महाराजांसाठी ३२ मण सोन्याचे सिंहासन महत्वाचे नव्हते. त्यांच्यासाठी प्रजेचं राज्य महत्वाचं होतं. रयतेचं राज्यचं त्यांची संकल्पना होती. शेतकरी हा त्यांच्या राज्याचा केंद्रबिंदू होता. त्याग सेवा पराक्रम ही त्यांची त्रिसूत्री होती. त्यांच्या विचारावर चालण्याचा संकल्प आपण केला पाहिजे. त्याग – सेवा – पराक्रम या त्रिसूत्रीचा संकल्प पूर्ण करून छत्रपतींचे स्वप्न पूर्ण करा, असे आवाहन विधिमंडळ लोकलेखा समिती अध्यक्ष आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले. ते चंद्रपूर महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे तिथीनुसार बुधवार (३१मार्च) ला शिवजन्मोत्सवा निमित्य आयोजित “भव्य उंच भगवा ध्वज लोकार्पण सोहळ्यात उदघाटक म्हणून बोलत होते. यावेळी मंचावर अध्यक्षस्थानी महापौर राखी कंचर्लावार, सभापती (स्थायी समिती) रवी आसवानी, महानगर भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे, मनपा गटनेते संदीप आवारी, महिला बाल कल्याण सभापती चंद्रकला सोयाम, उपसभापती पुष्पा उराडे, झोन सभापती संगीता खांडेकर यांची अतिथी म्हणून उपस्थिती होती.
याप्रसंगी आ मुनगंटीवार यांनी, छत्रपतींच्या राजवटीतील अनेक पराक्रमी व लोकहीतकारी निर्णयाचे महत्त्व विशद केले. शिवरायांना जिवा पेक्षाही दिलेला शब्द पालन करणे प्रिय होते असे ते म्हणाले. जय भवानी जय शिवाजी या जयघोषात थर्मल पॉवर पेक्षा जास्त ऊर्जा आहे. हजार सूर्याचे तेज असणाऱ्या रयतेचं राज्य निर्माण करणाऱ्या शिवबाचा आदर्श स्वीकारावा असे आवाहन त्यांनी उपस्थित तरुणाईला उद्देशून केले.
अर्थमंत्री असतांना शिवरायांची तपोभूमी असणाऱ्या श्रीक्षेत्र श्रीशैलम( तेलंगणा)येथे राज्य शासनातर्फे भव्य स्मारक आपण उभारण्या साठी आपण सहकार्य केले अशी माहिती त्यांनी दिली.
याप्रसंगी भाजपा नेते प्रमोद कडू, भाजपा (श)महामंत्री राजेंद्र गांधी, सुभाष कासनगोट्टूवार, ब्रिजभूषण पाझारे, रवींद्र गुरनुले, कोषाध्यक्ष प्रकाश धारणे, मंडळ अध्यक्ष रवी लोणकर, विठ्ठलराव डुकरे, सचिन कोतपल्लीवार, उपाध्यक्ष सुरज पेदूलवार, सचिव रामकुमार अका पेलिवार, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष अंजली घोटेकर, महामंत्री शिला चव्हाण, प्राचार्य प्रज्ञा गंधेवार, सपना नामपल्लीवार, उपाध्यक्ष मंजुश्री कासंगोट्टूवार, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर, महामंत्री प्रज्वलंत कडू, नगरसेवक संजय कंचर्लावार, राजेंद्र अडपेवार, आशा आंबोजवार, शीतल कुळमेथे, छबू ताई वैरागडे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन डॉ प्रशांत आर्वे केले तर सुभाष कासनगोट्टूवार यांनी आभार मानले.