प्रशासनाचा निष्काळजीपणामुळे नागरिकांचे जीव धोक्यात.

51

प्रशासनाचा निष्काळजीपणामुळे नागरिकांचे जीव धोक्यात.

अपघाताला बळी पडून स्वर्गाच्या दरबारात हजेरी लागल्यास त्यास जबाबदार कोण ? नागरिकांना पडलेला प्रश्न.

प्रशासनाचा निष्काळजीपणामुळे नागरिकांचे जीव धोक्यात.

मारोती कांबळे
एटापल्ली तालुका प्रतिनिधी
एटापल्ली,दि.1 मार्च:- एटापल्ली नगर पंचायत वाड क्रमांक ७ हणुमान मंदिर रस्त्याचा मधोमध असणारा खड्डा दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या जीवावर बेतत आहे. खड्ड्यामुळे दुचाकींचे वारंवार अपघात होत असल्याचे दिसून येत आहे. तेव्हा अपघाताला बळी पडून स्वर्गाच्या दरबारात हजेरी लागल्याने त्यास जबाबदार कोण ? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

सदर खड्डा हा मागील तीन ते चार महीण्यापासुन याच अवस्थेत असून या संदर्भात तक्रार करूनही यात प्रशासनाची मात्र रस्ते दुरुस्तीबाबत उदासीनता दिसून येत आहे. नगर पंचायत या प्रश्नाकडे सोयीस्कर दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट होते. रस्त्याचा मधोमध नालीवरील पुलावर असणाऱ्या या खड्ड्यामुळे रात्रीचा वेळेस या मार्गावर अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. या बांधकामाला अंदाजे पाच ते सहा वर्ष पुर्वी बनविण्यात आले असून सुद्धा रोडाच्या मधोमद खंडा पडल्याने या खड्याकडे नगर पंचायतचे दुर्लक्ष असल्याचे चित्र दिसून येत आहे प्रशासनाच्या या निष्काळजीपणामुळे नागरिकांना यांचे परिणाम भोगावे लागत आहे.

नागरिकांनी नगर पंचायत कडे अनेकदा तोंडी तक्रार करून सुंदा याकडे दुर्लक्ष केले जात आहे वारंवार तक्रार करूनही यावर कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी केलेली नाही त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे. लवकरात लवकर या खड्ड्याची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी वाड क्रमांक ७ येथील नागरीकांनी केले आहे.