सफाई कामगाराचा हक्कासाठी वंचित बहूजन आघाडीचा एल्गार.

55

 

सफाई कामगाराचा हक्कासाठी वंचित बहूजन आघाडीचा एल्गार.

सफाई कामगारांच्या विविध मागण्याकरिता आयुक्ताना दिले निवेदन.

सफाई कामगाराचा हक्कासाठी वंचित बहूजन आघाडीचा एल्गार.

पुणे जिल्हा प्रतिनिधी ✒
पिंपरी चिंचवड:- शहराची रोजची घाण साफ करणे हे नित्याचे काम असुन याचं धर्तीवर पिंपरी चिंचवड शहराची वर्षानुवर्षे घाण साफ करणाऱ्या सफाई कामगारांना देखील त्यांच्या सेवेत कायम करण्यात यावे व कायम सेवकास पात्र असलेले वेतन त्यांना अदा करण्यात यावे अशी मागणी गेली कित्येक वर्षे महानगरपालिका प्रशासनाकडे प्रलंबित आहे..परंतु महानगरपालिका प्रशासन मात्र सफाई कामगारांना न्याय द्यायच्या भुमिकेत दिसत नाही. उलट ठेकेदारांच्या माध्यमातून सफाई कामगारांचे आर्थिक व मानसिक शोषण करीत आहे.

सफाई सेवकांना त्यांच्या सेवेत कायम करण्या संदर्भात तुर्तास जर काही तांत्रिक अडचणी असतील तर या सफाई सेवकांना समान काम समान वेतन या धर्तीवर कायम सेवकास जे वेतन अदा केले जाते ते वेतन व पी.एफ व ई.एस.आय सारख्या सुविधा त्यांना पुरवण्यात याव्यात व नंतर तांत्रिक अडचणी दुर करून त्यांना सेवेत कायम करण्यात यावे या मागणीवर देखील महापालिका प्रशासन कुठलीही भुमिका घ्यायला तयार नाही.

सद्यस्तिथीत सफाई कामगारांना महापालिकेच्या वतीने ठेकेदारामार्फत कामावर ठेवुन जे वेतन अदा केले जाते त्यावर देखील संबंधित ठेकेदार डल्ला मारत आहेत. या सफाई कामगारांची ए.टी.एम व पासबुक हे ठेकेदार स्वतःकडे जमा करून घेऊन त्यातुन त्यांच्या श्रमाच्या मोबदल्यात अत्यंत कवडीमोल मोबदला त्यांना अदा करीत आहेत व सफाई कामगारांची फसवणुक करीत आहेत. सर्वसामान्य कुटुंबातुन येणारा सफाई सेवकांना त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी कामाची गरज असल्यामुळे निमुटपणे वर्षानुवर्षां पासुन ठेकेदार व महापालिकेच्या माध्यमातून होणारे त्यांचे हे शोषण ते निमुटपणे सहन करीत आले आहेत. जर सफाई सेवकांनी या विरोधात आवाज केला तर ठेकेदार त्यांना कामावरून कमी करतो अथवा कमी करण्याची धमकी देतो. एकंदर या साऱ्या प्रकारात सर्वसामान्य सफाई कामगार नाडला जात असुन महापालिका प्रशासन व संबंधित ठेकेदार यांच्या मध्ये तो पिचला जात आहे. या साऱ्या प्रकारावर वंचित बहुजन आघाडी पिंपरी चिंचवड शहर आपणांस ईशारा देत आहे की आपण या साऱ्या अनुचित प्रकारावर लक्ष घालुन सफाई कामगारांना न्याय मिळवुन देण्यासाठी तात्काळ सकारात्मक भुमिका घेऊन सफाई कामगारांना न्याय मिळवुन द्यावा.

1) वर्षांनुवर्षे शहराची घाण साफ करणाऱ्या व सेवेत कायम न करण्यात आलेल्या सफाई सेवकांना सेवेत कायम करावे

2) तात्काळ सेवेत कायम करण्यासंदर्भात काही तांत्रिक अडचणी असतील तर तुर्तास”समान काम समान वेतन” या तत्वानुसार त्यांना कायम सेवेस पात्र असे वेतन अदा करावे व नंतर तांत्रिक अडचणी दुर झाल्यानंतर त्यांना सेवेत कायम करण्यात यावे.

3) सफाई कामगारांची आर्थिक लुट व मानसिक शोषण करणाऱ्या कंत्राटदारांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावेत

4) समान काम समान वेतन तत्वानुसार आजतागायत सफाई कामगारांना न दिल्या गेलेल्या वेतनाचा अनुशेष व कंत्राटदाराने वेतानातील हस्तगत केलेली रक्कम सफाई कामगारांना त्वरित मिळावे

आशा मागण्या वंचित बहुजन आघाडी पिंपरी चिंचवड शहर आपणांस करीत आहे. जर या मागण्यांवर तात्काळ आपण सकारत्मक निर्णय घेतला नाही.. तर वंचित बहुजन आघाडी सफाई कामगारांच्या न्याय व हक्कांसाठी रस्त्यावर उतरले याची नोंद घ्यावी.

मा. इंजि. देवेंद्र तायडे
अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी, पिंपरी चिंचवड शहर