ग्राम पंचायत कार्यालय तोडसा येथे माहे मार्च 2021ची मासिक सभा संपन्न.
मारोती कांबळे
एटापल्ली तालुका प्रतिनिधी
एटापल्ली:- दि 31 रोजी बुधवार ला 11:00 वाजता मासीक सभा घेण्यात आले आहे. या सभेचे विषय 15 वित्त आयोग योजनेतुन (आमचा गाव आमचा विकास) आणि वार्षिक नियोजन आराखडा नुसार 50% पाणीपुरवठा वर खर्च करने करिता सर्व 12 जि प शाळानां व तोडासा ग्रामपंचायत अर्तंगत येनाऱ्या १० अंगणवाडी केंद्राना समर्सिबल मोटर, पाण्याची टाकी व पाईप लाईन बसवुन मुलांना पाणी पीण्याची सोय सुलकं होईल या उद्देशाने ही सभा घेण्यात आले.
तसेच शौचालयाची व्यवस्था आणि विद्युत मिटर, इलेक्ट्रिक फिटींग, ऑफिसीयल साहित्य खरेदी व वारली पेंटिंग, रंगरंगोटी, घनकचरा व्यवस्थापन बाबत ठराव मंजुर करण्यात आले आहे. तरी या सभेला सरपंच प्रशांत आत्राम, ग्राम विकास अधिकारी देविदास पिल्लारे, ग्राम पंचायत सदस्य बाबुराव कोरामी, चिन्ना नरोठे, दलसु मितलामी, गिता नरोठे, प्रेमिला गोटा आणि अनिता गावडे व तोडासा ग्राम पंचायत कर्मचारी उपस्थित होते. ही सभा ग्रामपंचायत तोडसा येते पार पडली व व्यवस्थापन बाबत ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले.