जावयाने कोयत्याने सपासप वार करुन केली सासूचा हत्या; पत्नी गंभीर जखमी.
✒प्रदिप शिंदे, जालना जिल्हा प्रतिनिधी ✒
जालना,दि.2 अप्रिल :- जिल्हातील परतुर तालुक्यातील बाबुलतारा गावात एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. पाणी गरम करण्याच्या क्षुल्लक कारणावरून नवरा बायकोचा वाद झाला, यावादातून चिडलेल्या नव-याने धारदार कोयत्याने सासु व पत्नीवर सपासप वार केले. यामध्ये सासू जागीच ठार झाली. तर पत्नी गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर संभाजीनगर येथे घाटी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना 2 एप्रिल रोजी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास घडली.
जावयाने हत्या केलेल्या सासूचे नाव रेशम कोळे वय 60 वर्ष असे आहे. परतुर तालुक्यातील बाबुलतारा येथे रेशम कोळे हिची मुलगी कविता हिचा काही वर्षांपूर्वी रामनगर तालुका जालना येथील संतोष महादेव सरोदे याच्यासोबत विवाह झाला होता. विवाहानंतर संतोष सरोदे व त्याची पत्नी कविता हे दोघेही बाबुलतारा येथे वास्तव्यास आहे. त्यांना 3 मुली 1 मुलगा अशी 4 अपत्ये आहेत.
प्राप्त माहितीनुसार 2 एप्रिल रोजी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास पाणी गरम करुन देण्याचा क्षुल्लक कारणावरून चिडलेल्या संतोष सरोदे यांनी सासु रेशम कोळे व पत्नी कविता यांच्यावर कोयत्याने सपासप वार केले. यामध्ये रेशम कोळे यांचा घटनास्थळी मृत्यु झाल्या. तर पत्नी कविता सरोदे या गंभीररित्या जखमी झाल्या. कविता हिच्यावर संभाजीनगर येथील घाटी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत जखमी कविता सरोदे हिच्या फिर्यादीवरून परतुर पोलीस ठाण्यात पती संतोष महादेव सरोदे याच्याविरूद्ध खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला. तपास फौजदार राजेंद्र ठाकरे करीत आहे.
सासूची हत्या आणि पत्नीवर जीवघेणारा हल्ला करणारा पती संतोष महादेव सरोदे हा घटनास्थाना वरुन फरार झाला. यास परतुर ठाण्याचे फौजदार राजेंद्र ठाकरे व त्यांच्या पथकाने पाठलाग करून, जालना-मंठा रोडवरील रामनगरजवळ पकडले आहे.