हिंगणघाट तालुक्यातील वडणेर येथे दारु नको; हाताला काम द्या, गांधी जिल्ह्यातील तरुणाईची मागणी.
✒ प्रा. अक्षय पेटकर, प्रतिनिधी ✒
हिंगणघाट:- तालुक्यातील वडणेर येथे दारु मुक्ती आंदोलनचे वतीने व विर भगतसिंह विद्यार्थी परिषद; नेहरु युवा मंडळाचे युवक व युवतींची सभा वडनेर ता. हिंगणघाट येथील युवा प्रेरणा संस्थेचे हाॅलमधे दि.27 रोजी विकास तिजारे या युवकाचे अध्यक्षते खाली कोरोना बंधने पाळून बैठकीत संपन्न झाली. त्यामधे प्रामुख्याने शिक्षित तरुणांमधील बेरोजगारीची व मातृभूमिची सेवा करण्यास भगतसिंगाचे वारसांना सेवा करण्यास तत्पर असणाय्रा तरुणाईला राज्यकर्त्यांनी संधि देण्यापासून वंचित ठेवले आहे. रोजगार देण्याऐवजी त्याचे समोर दारुचा पेला दिल्या जात आहे. व्यसनाधिन बनवून त्यांचे तारुण्य उध्वस्त केल्या जात आहे.
वडनेर परीसरच नव्हे तर संपूर्ण वर्धा जिल्ह्यात गावोगांव दारु विक्रीची दुकाने सर्रास सुरु आहेत. गांधीजींच्या स्वप्नातील ग्रामोद्योग युक्त वर्धा जिल्हा व समर्थ भारत घडविण्याची जबाबदारी येथील जिल्ह्याधिकारी प्रशासकाची व निवडणूक दिलेले आमदार लोक प्रतिनिधीची असतांना ते सर्व निष्क्रिय असल्याची उपस्थित युवक- युवतींनी केली. खेड्यातून येणाय्रा मुलींना शिक्षण घेण्यास येण्यासाठी बस, विज सेवा नाही, अभ्यास करता येत नाही, कोरोना ग्रस्त स्थितीत रोजगार नाही, पैसे नाहीत, विज कनेक्शन तोडल्या जात व अन्याय होत आहे. त्याविरुद्ध संघटीत आवाज उठविण्याची चर्चा बैठकीत करण्यात आली. जिंकू किंवा मारु; तरी गांधी जिल्ह्यात दारु बंदी करु, हर जोर जुल्मके खिलाफ संघर्ष हमारा नारा है, दारु बंदी कायद्याची अंमलबजावणी करा नाही तर आता उठवू सारे रान; आता पेटवू सारे रान. राज्यकर्ते व अधिकाय्रांची करु दानादान,आदि घोषणा बैठकीत देण्यात आल्यात. तसेच याकरीता जनजागरण व आक्रोश आंदोलनाचे नियोजनाकरीत कृति समिती करण्यात आली. राहुल दुरतकर तहसिल संघटक, सचिन महाजन, सचिव,जिल्हा समन्वयक गणेश शेळके, निखिल कळस्कर सहसंघटक, डाॅ. रविंद्र बोरकर, विकास तिजारे, सहसचिव,सदस्य विनय कुंभलकर, आरती बोरकर, मिनल जारोंडे, बैठकीनंतर उपरोक्त समितीने मुख्यमंत्री व जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्ररतार यांचेकडे तसेच हिंगणघाट तहसिलदार मुंदडा, राजेश शेटे ठाणेदार वडनेर यांना तातडीने दारु बंदी करा, ग्राम सुरक्षा दल, व तहसिलदाराचे अध्यक्षतेखाली व्यसनमुक्ती समीती करण्याच्या मागणीचे निवेदने पाठवलीत.या बैठकीला परीसरातील युवक; युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते. दारु मुक्ती आंदोलनाचे संयोजक भाई रजनीकांत प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते व त्यांनी या तरुणांच्या आंदोलनात सक्रिय सहभागी होण्याचे व अन्यायाचे लढ्यात पाठींबा जाहिर केला.