नागपुर अभियंता 21 वर्षीय तरुणीने घेतला गळफास.

56

नागपुर अभियंता 21 वर्षीय तरुणीने घेतला गळफास.

नागपुर अभियंता 21 वर्षीय तरुणीने घेतला गळफास.
नागपुर अभियंता 21 वर्षीय तरुणीने घेतला गळफास.

✒️युवराज मेश्राम नागपूर जिल्हा प्रतिनिधी✒️
नागपूर,दि.3 अप्रैल:- नागपुर येथील टाटा कंपनीत अभियंता या पदावर काम करत असलेल्या एका 21 वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 21 वर्षीय जवान तरुणी ने इतके टोकाचे पाऊल का उचलले म्हणून सर्वीकडे हळहळ व्यक्त होत आहे.

नागपुर जिल्हातील वाठोड्याच्या पवनशक्ती नगर येथे राहणा-या रागिनी जिंबल वासनिक वय 21 वर्ष असे गळाफासने मृत झालेल्या तरुणीचे नाव आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, वाठोड्याच्या पवनशक्तीनगरात राहणा-या रागिनीने बीई इंजीनियरचा अभ्यासक्रम पूर्ण केला होता. ती सध्या टाटा कंपनीत दोन महिन्यांपूर्वीच लागली होती. ऑनलाइन जॉब करणाऱ्या रागिनीने शुक्रवारी दुपारी 1 ते 2 च्या दरम्यान गळफास लावून आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नसल्याचे पोलीस सांगतात. दरम्यान, जिंबल बासिराम वासनिक यांनी दिलेल्या तक्रारीवरून वाठोडा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास पोलिसांनी सुरू आहे.