बँक डकैती व एटीएम चोरी प्रकरणातील आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, 1.7 कोटी रुपयाचे सोने व रोख रक्कम जप्त.
बँक डकैती व एटीएम चोरी प्रकरणातील आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, 1.7 कोटी रुपयाचे सोने व रोख रक्कम जप्त.

बँक डकैती व एटीएम चोरी प्रकरणातील आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, 1.7 कोटी रुपयाचे सोने व रोख रक्कम जप्त.

15 दिवसाच्या आत टेम्भूर्डा बँक ऑफ महाराष्ट्र दरोडा प्रकरणातील आरोपीचा पर्दा फाश.

आरोपीच्या घरातून 1 कोटी 7 लाख 34 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करून जप्त.

महाराष्ट्र व तेलंगणा राज्यात 11 गुन्ह्याची आरोपींनी केली कबुली.

बँक डकैती व एटीएम चोरी प्रकरणातील आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, 1.7 कोटी रुपयाचे सोने व रोख रक्कम जप्त.
बँक डकैती व एटीएम चोरी प्रकरणातील आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, 1.7 कोटी रुपयाचे सोने व रोख रक्कम जप्त.

मनोज खोब्रागडे✒
चंद्रपूर / गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी 
चंद्रपूर :- सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर यांनी सायबर सेल चंद्रपुर यांचे मदतीने बँक डकैती व एटीएम चोरी प्रकरणातील आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करुन उत्तरप्रदेशातुन 2 आरोपीसह 1.7 कोटी रुपयाचे सोने व रोख रक्कम जप्त केली. सदर आरोपी शोध कामी स्थानिक गुन्हेंशाखेचे २ पोलीस अधिकारी व 9 पोलीस अंमलदार यांनी मोठया शिताफीने व जिवाची बाजी लावुन आरोपींना अटक केली. याकामी उत्तर प्रदेशातील स्थानिक पोलीस पथकाने यांनी मोलाची मदत केली.
चंद्रपूर जिल्ह्यात 20 मार्चला वरोरा तालुक्यातील टेम्भूर्डा येथील बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये झालेल्या दरोडा प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेला यश प्राप्त झाले असून आरोपींचा विविध गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.

20 मार्च 2021 ला टेम्भूर्डा येथे गॅस कटरच्या सहाय्याने बँक ऑफ महाराष्ट्र येथील खिडकी तोडीत प्रवेश केला व बँकेतील रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण 11 लाखांचा मुद्देमाल अज्ञात चोरांनी लंपास केला होता. गुन्हा घडल्यानंतर आरोपींना पकडण्याची जबाबदारी जिल्हा पोलिस निरीक्षक अरविंद साळवे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना दिली.बाळासाहेब खाडे यांनी या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पथके तयार करीत वेगवेगळ्या दिशेने तपासाला सुरुवात केली.

वर्ष 2013 ला असाच एक गुन्हा माढेळी व तेलंगणा राज्यात घडला होता त्या गुन्ह्यातील आरोपींना वेगवेगळ्या राज्यातून अटक करण्यात आली होती. बँक ऑफ महाराष्ट्र व मागील गुन्ह्याच्या प्रकारात साम्य असल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि जितेंद्र बोबडे व पोउनी संदीप कापडे यांनी या गुन्ह्यातील आरोपीचा शोध सुरू केला. 26 मार्चला मागील घडलेल्या गुन्ह्यातील आरोपी देविदास रुपचंद कापगते, राजू वरभे, संकेत उके यांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली.अटकेतील आरोपीनी उत्तरप्रदेश राज्यातील ककराला गॅंग मधील सहा इसमांसोबत मिळून केला असल्याची कबुली दिली.

सदरील प्रकरणातील मुख्य आरोपी बदायु येथील रहिवासी नवाबउल हसन याला ताब्यात घेण्यासाठी सपोनि बोबडे व संदीप कापडे हे आपल्या चमुसह बदायु कडे रवाना झाले. स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने “ऑपरेशन ककराला ” सुरुवात केली, स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपींच्या हालचालीवर लक्ष केंद्रित करीत माहिती गोळा करण्यात आली होती, 31 मार्चला मुख्य आरोपी नवाब उल हसन हा हसनपूर येथे साथीदाराला भेटण्याकरिता येणार असल्याची गुप्त माहिती प्राप्त झाली माहितीच्या आधारे सापळा रचण्यात आला, या कारवाईत आरोपिसोबत पोलिसांची झटापट झाली ज्यामध्ये जितेंद्र बोबडे व संदीप कापडे यांना दुखापत सुद्धा झाली मात्र हिंमत न हारता आपल्या चमुसह त्या 2 आरोपींना अटक करण्यात आली.

दोन्ही आरोपींना बदायु जिल्ह्यातील आलापूर पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली असता त्यांनी उत्तरप्रदेश येथे 6, चंद्रपूर जिल्ह्यात 2 व गोंदिया जिल्ह्यात 1 घटनेत सहभाग असल्याची कबुली दिली.आरोपी नवाब उल हसन यांच्या घराची चौकशी केली असता त्यांच्या घरातून तब्बल 1 कोटी 7 लाख 34 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.आरोपींना वरोरा पोलिसांच्या ताब्यात दिल्यावर पुन्हा चौकशी केली असता त्यांनी महाराष्ट्र व तेलंगणा राज्यात एकूण 11 गुन्ह्याची कबुली दिली, न्यायालयाने सर्व आरोपींना 8 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या चमुसह सायबर पोलीस स्टेशनमधील कर्मचाऱ्यांनी यशस्वीपणे पार पाडली.यासाठी एल सी बी चे सर्वत्र कौतुक केल्या जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here