घरफोडीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गणेश सोनार पोलिसांच्या अटकेत.
विशाल सुरवाडे, जळगाव जिल्हा प्रतिनिधी
जळगाव :- घरफोडीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गणेश भास्कर सोनार यास एमआयडीसी पोलिसांनी तालुक्यातील चिंचोली येथून अटक केली आहे. सन 2020 मधे जळगाव मनपाच्या ढाकेवाडी येथील निर्मलाबाई लाठी शाळेतील घरपट्टी विभागातील कार्यालयात घरफोडीचा प्रकार झाला होता. या घटनेत घरपट्टी विभागाच्या कार्यालयातील कॉम्प्युटर लॅबच्या दरवाजाची कडी तोडून चोरट्यांनी आत प्रवेश करत कार्यालयातील 69 हजार रुपये किमतीचे तिन कॉम्प्युटर संच, दोन प्रिंटर, इन्व्हर्टर, बॅटरी, नेट राऊटर असा ऐवज चोरुन नेला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला महेश शरद कोठावदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गु.र.न. 891/20 भा.द.वि. 457, 380,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी आकाश उर्फ राधे अजय सोनार, अविनाश रामेश्वर राठोड, दिपक जयलाल पटेल, गणेश भास्कर सोनार व एक विधी संघर्षित बालकाचा समावेश असल्याचे उघड झाले होते. घटना घडल्यानंतर व उघडकीस आल्यापासून गणेश भास्कर सोनार हा फरार होता. सहायक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, हेमंत कळस्कर , चंद्रकांत पाटील, गफ्फार तडवी, सुधीर साळवे यांनी त्याला चिंचोली गावातून ताब्यात घेत अटक केली आहे. तो नुकताच सुरत येथून आला असतांना त्याला चिंचोली येथून अटक करण्यात आली. त्याला उद्या न्यायालयत दाखल केले जाणार आहे. त्याच्यावर यापुर्वी देखील काही गुन्हे दाखल आहेत.