"बनावट भोगवटा प्रमाणपत्र" गटविकास अधिकारी यांच्या विरोधात पो.स्टे. ब्रम्हपुरी येथे तक्रार दाखल.
"बनावट भोगवटा प्रमाणपत्र" गटविकास अधिकारी यांच्या विरोधात पो.स्टे. ब्रम्हपुरी येथे तक्रार दाखल.

“बनावट भोगवटा प्रमाणपत्र” गटविकास अधिकारी यांच्या विरोधात पो.स्टे. ब्रम्हपुरी येथे तक्रार दाखल.

कार्यवाहीस दिरंगाई व दोषींची पाठराखण केल्याचा तक्रार कर्त्यांचा आरोप.

"बनावट भोगवटा प्रमाणपत्र" गटविकास अधिकारी यांच्या विरोधात पो.स्टे. ब्रम्हपुरी येथे तक्रार दाखल.
“बनावट भोगवटा प्रमाणपत्र” गटविकास अधिकारी यांच्या विरोधात पो.स्टे. ब्रम्हपुरी येथे तक्रार दाखल.

अमोल माकोडे, ब्रम्हपुरी प्रतिनिधी
ब्रम्हपुरी:- यंग इंजिनियरिं एज्युकेशन सोसायटी कुरखेडा अंतर्गत महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी,डी फॉर्म कॉलेज बेटाळा येथील संस्थेने वापरलेला “बनावट भोगवटा प्रमाणपत्र” प्रकरणाबाबत पोलीस विभागाकडून चौकशी करण्यात आली होती सदर बनावट भोगवटा प्रमाणपत्रावर सरपंच सौ. विदया विलास मेश्राम यांची स्वाक्षरी असून त्यांनी स्वतः ही स्वाक्षरी मनीषा विलास मेश्राम या नावाने केली असल्याचे लेखी बयान पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी येथे दिले आहे.त्यामुळे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जि.प चंद्रपुर यांनी पुढील कार्यवाही करण्यासाठी गट विकास अधिकारी प.स ब्रम्हपुरी यांना आदेशीत केले आहे.गटविकास अधिकारी प.स ब्रम्हपुरी यांच्या कडील निवेदनास 200 दिवसाचा कालावधी पूर्ण होऊनही गटविकास अधिकारी प.स ब्रम्हपुरी यांनी संबंधित बाबतीत गुन्हा नोंदविण्याची कार्यवाही केली नाही व या मुळे गुन्हेगारास अभय प्राप्त होत आहे.

एकंदरीत गटविकास अधिकारी प.स ब्रम्हपुरी हे गुन्हेगारांना सहाय्य करीत असल्याची ही बाब संघटीत गुन्हेगारीच्या स्वरूपाची असल्याने गटविकास अधिकारी प.स ब्रम्हपुरी यांच्या विरोधात फौजदारी कार्यवाही करण्यासाठी दि. ४/४/२०२१ पो.स्टे ब्रम्हपुरी येथे रिपोर्ट करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here