जळगाव वैद्यकीय महाविद्यालय हलगर्जी पणामुळे प्रदीप पावरा यांचा मृत्यु. परीवाराचा गंभीर आरोप.
जळगाव वैद्यकीय महाविद्यालय हलगर्जी पणामुळे प्रदीप पावरा यांचा मृत्यु. परीवाराचा गंभीर आरोप.

जळगाव वैद्यकीय महाविद्यालय हलगर्जी पणामुळे प्रदीप पावरा यांचा मृत्यु. परीवाराचा गंभीर आरोप.

प्रदिप पावरा यांचा उपचारा दरम्यान झालेल्या निष्काळजीपणा व आदिवासी असल्याने केलेल्या हेडसाळी व दुर्लक्ष केल्या मुळे संपूर्ण चौकशी करून दोषिवर गुन्हा दाखल होण्यासाठी राज्यपालाना निवेदन.
सिटी पोलीस स्टेशन येथे तक्रार अर्ज दाखल व सीसीटीव्ही फुटेज मिळाल्या शिवाय प्रेत ताब्यात न घेण्याचा निर्णय.

जळगाव वैद्यकीय महाविद्यालय हलगर्जी पणामुळे प्रदीप पावरा यांचा मृत्यु. परीवाराचा गंभीर आरोप.
जळगाव वैद्यकीय महाविद्यालय हलगर्जी पणामुळे प्रदीप पावरा यांचा मृत्यु. परीवाराचा गंभीर आरोप.

✒विशाल सुरवाडे जळगाव जिल्हा प्रतिनिधी ✒
जळगाव:- प्रदीप पावरा ह्यांना दि.29मार्च रोजी सकाळी श्वास घेण्यास त्रास होत असल्याने चोपडा तालुक्यातील लासुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारा साठी घेवून गेले तिथे असलेल्या डॉक्टरांनी ताबडतोब चोपडा येथे हलवण्यास सांगितले मात्र प्रदीप पावरा यांचा स्वाब चा रिपोर्ट ही परीवाराला दिला नाही की विनंती करून ही आम्हाला अम्बुलंस दिली नाही शेवटी त्यांचा मुलांनी त्याना दुचाकी मध्ये बसवले व त्यांचा पत्नीला मागे बसवून टिबलशिट 22 किमी अंतर दुचाकी मोटरसायकल वर पार करून ग्रामीण रुग्णालय चोपडा येथे आणले तेथील डॉक्टर मनोज पाटील यानी पेशंटचे कुठलेच रिपोर्ट नाहीत मात्र ऑक्सिजन लेव्हल 79 असल्याने ताबडतोब स्वाब घेतला प्राथमिक उपचार केला व पेशंट डायबेटिक असल्याने उपचारा साठी जळगाव येथील रुग्णालयात रेफर केले व ऑक्सिजन लावून अम्बुलंस मध्ये जळगावला पाठवले मात्र जळगाव लोक संघर्ष मोर्चा संघटनाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी, जळगाव वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन यांना खूप विनंती केली की पिढीत परीवाराची आर्थिक परिस्थिती नसल्याने त्या रुग्णाला जळगाव येथील सरकारी मैडिकल कॉलेज आणि रुग्णालयात भर्ती करून घ्यावे मात्र त्यांनी त्याबाबत असमर्थता दाखवली व कुठलीही मदत केली नाही. अम्बुलंस मधील ऑक्सिजन साठा संपत आल्याने मग नाईलाजाने आम्ही जळगाव येथील आरुषी या खाजगी रुग्णालयात दाखल केले तेथील डॉक्टरांनी उपचाराचे पैसे घेतले नाहीत मात्र मेडिकल बिलाचा खर्च या गरिब परीवाराला आम्हाला पेलवत नसल्याने ते पुन्हा लोक संघर्ष मोर्चा या संघटनेच्या लोकांच्या मार्फत जिल्हाधिकारी तथा नवसांजवनी कमेटचे अध्यक्ष यांना विनंती केली आणि मग त्यांना गी.एम.सी जळगाव येथे 30 मार्च रोजी रात्री भरती करुन घेतले.

मुलाने आणि नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार माझ्या वडिलांना जळगाव मेडिकल कॉलेज येथील वॉर्ड नंबर 14 ह्या आय.सी.यु वॉर्ड मधे भरती केले. माझे वडील डायबेटिक असल्याने त्यांना ताबडतोब ऑक्सिजन व इतर उपचार सुरू करण्याची आम्ही विनंती केली. वडील 2 एप्रिल पर्यंत त्या वॉर्ड मधे भरती होते तेव्हा त्यांनी आम्हाला बोलावून सांगितले की रूम मधील वॉर्ड बॉय व डॉक्टर पाणी मागितले किंवा काही दाखवायला बोलावले की सारखे सांगतात तू आम्हाला बोलावले तर तू मेला तरी तुला पाणी देणार नाही तुला बघायला येणार नाही, कुठून कुठून हे आदिवासी येतात आम्हाला त्रास द्यायला ह्या बाबत आम्ही गी.एम.सी रुग्णालयाच्या वैधकीय अधीक्षक यांचाकडे तोंडी तक्रार ही दोन तारखेला केली होती व मोबाईल वॉट्सएप्प द्वारा जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार केली होती माझ्या वडिलांना मी त्यामुळे दोन तारखेला नियमात नसतांना मी पाणी दिले दोन तारखेला रात्री 9 वाजता मी वडिलांना बघून घरी आलो व दुसऱ्या दिवशी म्हणजे 3 मार्च रोजी हॉस्पिटल मधे गेलो तर तिथे वॉर्ड नंबर 14 मधे माझे वडील नव्हते ते कुठे गेले हे विचारून ही कोणी सांगत नव्हते तेव्हा संघटनेच्या लोकांनी कोविड बेड हेल्पलाईन ला फोन करून विचारल्यावर त्यांनी पेशंट पी.एन.सी वॉर्ड मधे शिफ्ट केल्याचे सांगितले मी धावत आई सोबत वॉर्ड मधे पोहचलो तर माझे वडील झटके मारत व जोर जोरात विहळत होते आम्ही त्यांना धरून ठेवले व संघटनेच्या प्रतिभाताई शिंदे यांना फोन केला त्यांनी हॉस्पिटल मध्ये धाव घेत वैधकीय अधीक्षक डॉ. रामानंद यांना सोबत घेवून पीएनसी वॉर्ड मध्ये ते आलेत तेव्हा शेजारच्या पेशंट यांनी सांगितले की हे पेशंट इथे आल्या नंतर पलंगावरून खाली पडले व खूप वेळ पडून होते. व जोरात विव्हळत होते. मात्र कोणी ही न आल्याने आम्ही काही वेळाने हिम्मत करून यांना कॉट वर टाकले तेव्हा पासून पेशंट पूर्ण गंभीर अवस्थेत चालले गेले. गी.एम.सी चे वैधकीय अधीक्षक यांनी पेशंटला पुन्हा 14 नंबर वॉर्ड मधे शिफ्ट केले, मात्र तेव्हा पासून पेशंट पूर्ण अचेतन झाला ते काल रात्री 9.40 ला मृत्यू होई पर्यंत अचेतनच राहिला.

महाराष्ट्राचा राज्यपालांना कारवाई साठी निवेदन .

आम्ही आदिवासी समाजाचे व पेसां भागातील गरीब असल्याने माझ्या वडिलांवर उपचारा दरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्रा पासून तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचार करताना प्रचंड हेडसाळ झाली व अक्ष्यम असे दुर्लक्ष झाले व आम्हाला आणि पेशंटला जाणीव पूर्वक हिन वागणूक दिली ह्या बाबत शासकीय वैद्यकीय महाविद्याल्या तील वॉर्ड नंबर 14 व पीएनसी वॉर्ड चे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घ्यावे संबंधित कर्मचारी व डॉक्टर ज्यांनी उपचारादरम्यान जाणून बुजून दुर्लक्ष केले व आम्ही आदिवासी असल्याने हिन वागवले याची चौकशी करत दोषीवर तात्काळ अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावेत आम्ही सर्व मूल वडिलांवर अवलंबून शिक्षण घेत होतो आम्हाला पोरके करणाऱ्या दोषी वर चौकशी करून तात्काळ कार्यवाही करण्याची राज्यपालांनी आम्हाला न्याय द्यावा असे निवेदन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here