लसीकरण मोहीमेत चंद्रपूर जिल्‍हा देशात अव्‍वल ठरावा हा संकल्‍प भाजपाच्‍या स्‍थापना दिनानिमीत्‍त करू या: आ. सुधीर मुनगंटीवार

48

लसीकरण मोहीमेत चंद्रपूर जिल्‍हा देशात अव्‍वल ठरावा हा संकल्‍प भाजपाच्‍या स्‍थापना दिनानिमीत्‍त करू या: आ. सुधीर मुनगंटीवार

ऑडीओ ब्रिजच्‍या माध्‍यमातुन भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्‍यांशी साधला संवाद.

लसीकरण मोहीमेत चंद्रपूर जिल्‍हा देशात अव्‍वल ठरावा हा संकल्‍प भाजपाच्‍या स्‍थापना दिनानिमीत्‍त करू या: आ. सुधीर मुनगंटीवार
लसीकरण मोहीमेत चंद्रपूर जिल्‍हा देशात अव्‍वल ठरावा हा संकल्‍प भाजपाच्‍या स्‍थापना दिनानिमीत्‍त करू या: आ. सुधीर मुनगंटीवार

मनोज खोब्रागडे
चंद्रपूर / गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर:- 6 एप्रिल 1980 रोजी मुंबईतील बांद्रा रेक्‍लेमेशन शेजारील समुद्र किनारी भारतीय जनता पार्टीचे पहीले अधिवेशन संपन्‍न झाले. या अधिवेशनात सहभागी होण्‍याचे सौभाग्‍य मला लाभले. भारतरत्‍न अटलजींचे प्रेरणादायी विचार ऐकण्‍याची संधी मिळाली. अटलजींनी भाजपाचे विचार व दिशा आपल्‍या भाषणातुन स्‍पष्‍ट केली. पद म्‍हणजे दायीत्‍व, पद म्‍हणजे सेवेचे साधन असल्‍याचे सांगत अटलजींनी भविष्यवाणी केली, अंधेरा छटेंगा, सुरज निकलेगा, कमल खिलेगा, ही भविष्‍यवाणी खरी करण्‍यासाठी ज्‍या असंख्‍य कार्यकर्त्‍यांनी परिश्रम घेतले त्‍या सर्वांना आज स्‍थापना दिनानिमित्‍त मी नमन करतो असे प्रतिपादन विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले. सध्‍या कोरोनाची दुसरी लाट आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या नेत़त्‍वात कोरोना प्रतिबंधक लसीकरण देशभरात सुरू आहे. या लसीकरण मोहीमेला सहकार्य करत लसीकरणात चंद्रपूर जिल्‍हा देशात अव्‍वल ठरावा असा संकल्‍प या स्‍थापना दिवसानिमीत्‍त करत तो पुर्णत्‍वास नेण्‍याचे आवाहन आ. मुनगंटीवार यांनी केले.

दिनांक 6 एप्रिल रोजी भारतीय जनता पार्टीच्‍या स्‍थापना दिनानिमीत्‍त आ. सुधीर मुनगंटीवार यांनी ऑडीओ ब्रिजच्‍या माध्‍यमातुन भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्‍यांशी संवाद साधला. यावेळी बोलताना आ. मुनगंटीवार पुढे म्‍हणाले, आज भारतीय जनता पार्टी देशातील सर्वात जास्‍त सदस्‍य संख्‍या असलेली पार्टी आहे. या देशातील नागरिकांना प्रत्‍येक आपत्‍तीच्‍या समयी, संकट समयी भाजपाच्‍या कार्यकर्त्‍यांनी कायम मदत केली आहे. गोरगरीबांचे कल्‍याण ही आमची प्राथमिकता आहे. भयमुक्‍त भारत, भुकमुक्‍त भारत, विषमतामुक्‍त भारत, नक्षलवादमुक्‍त भारत, आतंकमुक्‍त भारत, रोजगारयुक्‍त भारत, वैभवशाली भारत हे भारतीय जनता पार्टीचे ध्‍येय आहे.

सेवा, संघर्ष, संघटन, संवाद, विकास ही आमची पंचसुत्री आहे. भाजपाच्‍या कार्यकर्त्‍यांनी सामाजिक उपक्रमांच्‍या माध्‍यमातुन नेहमी देशाची सेवा केली आहे. वर्षभरापुर्वी जेव्‍हा कोरोनाचे संकट उद़भवले व लॉकडाउन लागु करण्‍यात आला त्‍यावेळी चंद्रपूर जिल्‍हयात पी.पी.ई. कीटचे वितरण, मास्‍क, सॅनिटायझर, फुड पॅकेट, धान्‍य किट, पोलीस सुरक्षा किट, पोस्‍टमन सुरक्षा किटचे वितरण, ऑटोमॅटीक सॅनिटायझर मशिन, होमिओपॅथीक गोळयांचे वितरण, रूग्‍णांची ने-आण करण्‍यासाठी रूग्‍णवाहीका, महीनाभर रक्‍तदान शिबीर आयोजित करून त्‍यामाध्‍यमातुन रक्‍तदान, अडकलेल्‍या नागरिकांसाठी वाहन व्‍यवस्‍था अशी विविध माध्‍यमातुन गोरगरीब जनतेला मदत करण्‍यात भारतीय जनता पार्टी आघाडीवर राहीली. या जिल्‍हयात भारतीय जनता पार्टीचा विस्‍तार करण्‍यासाठी झटणा-या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्‍यांना मी वंदन करतो. कोरोनाच्‍या या दुस-या लाटेचा सामना करतांना आपली व आपल्‍या परिवाराची काळजी घेत नागरिकांना सर्वतोपरी सहकार्य करण्‍याचे आवाहन त्‍यांनी यावेळी बोलताना केले.

संवाद सेतुचे प्रास्‍ताविक भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे यांनी केले, यावेळी भाजपा महानगर जिल्‍हाध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांनी आभार मानले. संवाद सेतुला जिल्‍हयातील भाजपा प‍दाधिकारी व कार्यकर्त्‍यांची मोठया संख्‍येने उपस्थिती होती.

ऑडीओ ब्रिजपुर्वी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी भारतमातेचे पुजन केले. यावेळी भाजपाचे ज्‍येष्‍ठ नेते प्रमोद कडु, भाजपा महानगर जिल्‍हाध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, राजेंद्र गांधी, महापौर सौ. राखी कंचर्लावार, स्‍थायी समिती सभापती रवी आसवानी, भाजयुमो महानगर जिल्‍हाध्‍यक्ष विशाल निंबाळकर, कोषाध्‍यक्ष प्रकाश धारणे, सरचिटणीस सुभाष कासनगोट्टुवार, ब्रिजभुषण पाझारे, प्रज्‍वलंत कडु, सुरज पेदुलवार यांची उप‍स्थिती होती.