हिंगणघाट पोलिसांनी तूर दाळ चोरट्यांना केल अटक; 6 लाखाचा मुद्देमाल जप्त.

✒आशीष अंबादे, प्रतिनिधि✒
हिंगणघाट,दि.6 मार्च:- नजीकच्या परीसरातील आजंती जवळ असणा-या गोविंद अॅग्रो इंडस्ट्रीज या दाल मिलमधील तुरीची डाळ चोरण्यार्या आरोपींना हिंगणघाट पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून चोर रेली तुळीची डाळ तसेच वाहनासह 6 लाख 35 हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले.
हिंगणघाट पोलिस कडुन मिळालेल्या माहितीनुसार, दालमिलचे मालक सूरज मोटवाणी यांच्या गोविंद अॅग्रो इन्डस्ट्रिज या दालमिलमधून 1 लाख 25 हजार रुपये किंमत असलेली तुरीच्या डाळीचे 25 पोते एका अज्ञात व्यक्ती चोरून नेल्याची तक्रार 4 रोजी हिंगणघाट पोलिसांत केली होती. याप्रकरणी हिंगणघाट पोलिसांचे गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने चोरीस गेलेल्या डाळीबाबत शोध घेतला असता दालमिलमध्ये काम करणार्या कामगारांनीच चोरी केल्याचे उघकीस आले. दालमिलमध्येच कामावर असलेले आरोपी शिवनंदी कनोजिया वय 20 वर्ष रा. छिंदवाडा, रवी माहुरे वय 26 वर्ष रा.चंद्रपूर तसेच त्याचे सोबत हिंगणघाट येथील रहिवासी वाहनाचा चालक-मालक प्रज्वल पितळे वय 20 वर्ष रा. संत ज्ञानेश्वर वार्ड, हिंगणघाट या चौघांनी संगनमत करून तूर डाळीची चोरी केल्याच्या संशयावरून अटक केली.
न्यायालयाने त्यांची पोलिस कोठी मंजुर केली होती. पोलिस तपासादरम्यान त्यांनी यापुर्वी सुद्धा दोन वेळा तुरीच्या डाळीची चोरी केल्याची माहिती पोलिसांना दिली. तीनही आरोपी दालमिल येथुन तुरीच्या डाळीची चोरी करून हिंगणघाट येथे राहणार्या शेरअली सय्यद रा. हिंगणघाट यास विकायचे. या माहितीवरुन चोरीची डाळ विकत घेणार्या आरोपीसह चारही आरोपीकडुन गुन्ह्यात चोरीस गेलेल्या संपुर्ण मुद्देमालासह तुरीच्या डाळीच्या 37 बोर्या व गुन्ह्यत वापरलेले दोन वाहनं असा 6 लाख 35 हजार रुपयाचा माल जप्त करण्यात आला. ही कारवाही उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश कदम, पोलिस निरीक्षक संपत चव्हाण, सहा. पोलिस निरीक्षक पी. आर. पाटणकर यांच्या मार्गदर्शनात डि. बी. पथकाचे पो. हवा. शेखर डोंगरे, नापोशि निलेश तेलरांधे, सचिन घेवंदे, विशाल बंगाले, पोशि सचिन भारशंकर यांनी केली.