यवतमाळ जिल्हात डॉक्टरांवर धारदार शस्त्राने हल्ला. डॉक्टर गंभीर जखमी.

55

यवतमाळ जिल्हात डॉक्टरांवर धारदार शस्त्राने हल्ला. डॉक्टर गंभीर जखमी.

यवतमाळ जिल्हात डॉक्टरांवर धारदार शस्त्राने हल्ला. डॉक्टर गंभीर जखमी.
यवतमाळ जिल्हात डॉक्टरांवर धारदार शस्त्राने हल्ला. डॉक्टर गंभीर जखमी.

✒️साहिल महाजन यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी ✒️
यवतमाळ,दि.6.एप्रिल:- जिल्हातील वणी येथे एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. वणी येथील यात्रा मैदान परिसरात सोमवारी दुपारी 1 वाजताच्या सुमारास 2 ते 3 हल्लेखोरांनी डॉ. पद्माकर मत्ते यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. यात डॉक्टर मोठ्या प्रमाणात गंभीर जखमी झाले आहे. डॉ. पद्माकर मत्ते त्यांच्यावर खासगी रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात करुन. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नागपूरला रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

डॉ. मत्ते हे नेहमीप्रमाणे त्यांच्या रुग्णालयामध्ये रुग्ण तपासत होते. दुपारी 2 ते 3 हल्लेखोर रुग्ण बनून दवाखान्यात आले. त्यांना तपासणीसाठी आत बोलावले असता एकाने डॉक्टर यांच्या डोक्यावर, डोळ्याजवळ धारदार शस्त्राने वार केला. त्यांची किंचाळी एकूण रुग्णालयाचावर घरात असलेली त्यांची सून धावत खाली आली. तो पर्यंत हल्लेखोरांनी पोटावर व खांद्यावर सपासप वार केले. फसार झाले.

डॉक्टर वर हल्ला करणारे आरोपी हे दुचाकी मोटरसायकल क्रमांक एम.एच.29, बी.जी.2950 ने आले होते. डॉक्टर वर हल्ला केल्या नंतर ती दुचाकी मोटरसायकल सोडून पसार झाले. पोलिसांनी दुचाकी जप्त केली आहे. डॉ. मत्ते रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळले. यावेळी दवाखान्यात उपस्थित रुग्णांत चांगलीच खळबळ माजली. एका प्रत्यक्षदर्शीने तातडीने पोलिसांना सूचित केले. ठाणेदार वैभव जाधव यांनी घटनेचे गांभीर्य बघता घटनास्थळ गाठले. डॉ. मत्ते यांना प्रथम येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र गंभीर स्वरूपाच्या जखमा असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले आहे. या घटनेमुळे जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

काही दिवसांपूर्वी डॉ. मत्ते यांच्या रुग्णालयामध्ये उपचारार्थ आलेल्या तरुणाचा मृत्यू झाला होता. त्यावेळी मृताच्या नातेवाइकांनी डॉ. पद्माकर मत्ते यांचा रुग्णालयावर हल्ला चढवित डॉक्टरला मारहाण केली होती. आणि आज चाकूहल्ला झाल्याने प्रकरणाची गुंतागुंत वाढली आहे. हल्लेखोरांना शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. पुढील तपास पोलिस करत आहे.