भद्रावती व्यापारी असोशियन चा बदला विरोध, व्यापाऱ्यांनी तहसीलदारांना घातला घेराव.

47

भद्रावती व्यापारी असोशियन चा बदला विरोध, व्यापाऱ्यांनी तहसीलदारांना घातला घेराव.

भद्रावती व्यापारी असोशियन चा बदला विरोध, व्यापाऱ्यांनी तहसीलदारांना घातला घेराव.
भद्रावती व्यापारी असोशियन चा बदला विरोध, व्यापाऱ्यांनी तहसीलदारांना घातला घेराव.

त्रिशा राऊत, चिमूर तालुका प्रतिनिधी
चिमूर (भद्रावती): – कोरोना प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने पुकारलेल्या टाळेबंदी ने येथील व्यापारी असोसिएशनने विरोध केला असून. व्यापाऱ्यांना बंद करण्याच्या सूचना देण्याकरिता आलेल्या तहसीलदाराचा घेराव करून आम्ही कदापिही दुकाने बंद ठेवणार नाही या परिस्थितीचा सामना करण्यात आम्ही तयार असू असे तहसीलदाराला सांगण्यात आले.

आज भद्रावती येथे आठवडी बाजार असतो. सरकारने पुकारलेला निर्णयासंदर्भात तहसीलदार महेश शितोळे नायब, नायब तहसीलदार भांदककर त्यांची चंमू व पोलिस प्रशासनाचे अधिकारी पेट्रोल पंप चौक ते मुख्य मार्गावरील व्यापारी पेठेत येवून कोराना संदर्भात माहिती देऊन व्यापारी तसेच नागरिकांना सहकार्य करण्याकरिता विनंती करीत असताना येथील काही व्यापाऱ्यांनी सोनल टाकीज परिसरात चौकात येऊन तहसीलदाराचा घेराव घालून या लॉक डावून चा विरोध केला. यावेळी तहसीलदार महेश शितोळे यांनी उपस्थीतांना आपणास विरोध करायचा असेल तर रीतसर याबाबतचे निवेदन द्यावे त्यानंतर प्रशासन निर्णय घेईल असे त्यांनी व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले. यावेळी व्यापारी संघटनेचे राजेश कोठारी, निलेश गुंडावार, प्रवीण महाजन, शैलेश कोठारी, प्रकाश पामपट्टीवार, नितीन माशिदकर, शकील शेख, संतोष गोलछा यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते..

प्रवीण महाजन, उपाध्यक्ष व्यापारी संघटना भद्रावती
कोरोणा च्या काळात प्रशासनाला आम्ही वारंवार सहकार्य केले परंतू आता सततच्या ताळेबंदीमुळे व्यापारी आर्थिक संकटात सापडला आहे त्यामुळे राज्य सरकारने थोपवलेली टाळेबंदी आम्हाला मान्य नाही प्रशासनाने यावर जर जबरदस्ती केली तर पुढील आंदोलनासाठी व्यापारी संघटना तयार राहील.