चंद्रपूर महानगर भाजपा पूर्व (बंगाली कॅम्प) मंडळाची, कार्यकारणी जाहीर.
चंद्रपूर महानगर भाजपा पूर्व (बंगाली कॅम्प) मंडळाची, कार्यकारणी जाहीर.

महानगर भाजपा पूर्व (बंगाली कॅम्प) मंडळाची, कार्यकारणी जाहीर.

पक्षवाढीसाठी संघटन महत्वाचे – डॉ. मंगेश गुलवाडे.

चंद्रपूर महानगर भाजपा पूर्व (बंगाली कॅम्प) मंडळाची, कार्यकारणी जाहीर.
चंद्रपूर महानगर भाजपा पूर्व (बंगाली कॅम्प) मंडळाची, कार्यकारणी जाहीर.

मनोज खोब्रागडे✒
चंद्रपूर / गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर:- पक्षातील कार्यकर्ता हा पक्षाचा आत्मा आहे. त्याला मिळालेले पद हे मिरवायसाठी नसून कार्य करण्यासाठी असते. पद ही जवाबदारी आहे. पक्षवाढीसाठी संघटन महत्वाचे आहे, असे प्रतिपादन महानगर भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे यांनी केले. ते शुक्रवार,९ एप्रिलला भारतीय जनता पार्टीच्या, डॉ श्यामा प्रसाद मुखर्जी वाचनालय येथे आयोजित एका पक्षांतर्गत बैठकीत मंडळाची कार्यकारिणी घोषित करतांना बोलत होते.

यावेळी भाजपा नेते प्रमोद कडू, भाजपा महानगर महामंत्री राजेंद्र गांधी, सुभाष कासंगोट्टूवार, ब्रिजभूषण पाझारे, रवींद्र गुरनुले, कोषाध्यक्ष प्रकाश धारणे, प्रशांत विघ्नेश्वर, रामकुमार अकापेलिवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी पूर्व मंडळा (बंगाली कॅम्प)ची कार्यकारिणी घोषित करण्यात आली. डॉ गुलवाडे यांनी घोषित केल्या नुसार पूर्वमंडळ अध्यक्षपदी दिनकरराव सोमलकर, महामंत्रीपदी डॉ. गिरीधर येडे, मनोरंजन रॉय, रामजी हरणे व बलराम शाहा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी पूर्व (बंगाली कॅम्प) मंडळ महिला मोर्चा कार्यकारणी जाहीर करण्यात आली, त्यानुसार मंडळ अध्यक्षपदी वर्षाताई सोमलकर यांची तर महामंत्रीपदी नूतनताई मेश्राम, माताई आत्राम, रंजनाताई यादव यांची निवड करण्यात आली आहे.

पूर्व (बंगाली कॅम्प) मंडळ भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकारणीत मंडळ अध्यक्ष म्हणून संजय पटले महामंत्री म्हणून अंकुश सावसाकडे, हेमंत सिंघवी, किशोर बारई यांची घोषणा करण्यात आली.यावेळी भाजपा नेते कडू व गांधी यांचे हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना भाजपाचा दुपट्टा परिधान करण्यात आला, तर डॉ गुलवाडे यांचे हस्ते नियुक्तीपत्र व उर्वरित कार्यकारिणी मंडळ अध्यक्ष दिनकर सोमलकर यांना देण्यात आली. पूर्व मंडळातील एकूण ७५ पदाधिकाऱ्यांची घोषणा यावेळी डॉ मंगेश गुलवाडे यांनी केली.
सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे माजी वित्त मंत्री आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार, माजी केंद्रीयमंत्री हंसराज अहीर, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष अंजली घोटेकर, महामंत्री शिला चव्हाण, प्राचार्य प्रज्ञा बोरगमवार, सपना नामपल्लीवार, भाजयुमो जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर, महामंत्री प्रज्वलंत कडू, प्रमोद क्षीरसागर, सुनील डोंगरे आदींनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here