नालासोपारा शहरातील ईतिहासीक वारसा धोक्यात.

56

नालासोपारा शहरातील ईतिहासीक वारसा धोक्यात.

नालासोपारा शहरातील ईतिहासीक वारसा धोक्यात.
नालासोपारा शहरातील ईतिहासीक वारसा धोक्यात.

✒मनोज कांबळे, नालासोपारा प्रतिनिधी✒
नालासोपारा, दि.10 एप्रिल:- एखाद्या शहराचा वैभवशाली इतिहास तिथल्या समाजाला प्रेरणा देतो. असाच प्राचीन इतिहास लाभलेले नालासोपारा शहर (तत्कालीन नाव शूर्पारक) हे एकेकाळी प्रसिद्ध व्यापारी बंदर आणि बौद्ध धर्माचे महत्वाचे केंद्र होते. शहरातील सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी तत्कालीन व्यापारी पूर्णा यांनी बांधलेला बौद्धस्तूप या इतिहासाचं एक मूर्तिमंत प्रतीक आहे. राजा अशोक यांचा पुत्र धर्मेंद्र आणि कन्या संघमित्रा इथूनच बौद्धधम्म प्रसारासाठी श्रीलंकेला रवाना झाले होते. परंतु आजच्या काळात ह्या ऐतिहासिक वास्तूचा प्रशासन आणि शहरातल्या लोकांना जणू विसर पडलेला दिसत आहे.

स्थानिक बोलीभाषेत ‘बुरुड राजाचा कोट’ या नावाने ओळखला जाणाऱ्या ह्या बुद्धस्तूपाचं उत्खनन पंडित भगवानदास इंद्रजी यांनी 18882 साली सुरु केलं होत. जवळपास 17 फूट उंचीच्या या स्तूपाच्या उत्खननात त्यांना एक दगडी पेटी, सोन्याच्या मुर्त्या, भिक्षापात्र, धातूच्या आठ बुद्ध मुर्त्या सापडल्या होत्या. त्याबरोबर स्तूपाच्या परिसरात राजा अशोकाचे 8 आणि 9 क्रमांकाचे शिलालेख सापडल्याने या स्तूपाचं ऐतिहासिक महत्त्व आणखी अधोरेखित झालं होत.

याचा विचार करून 2011 साली महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड यांनी बौद्धस्तूपाच्या संरक्षण आणि संवर्धनाची योजना जाहीर केली होती. या योजनेअंतगर्त बौद्धस्तूपाजवळ विपस्सना केंद्र, संग्रहालय, धर्मशाळा आणि प्रवाश्यासांठी स्वच्छतागृह, तलाव शुशोभीकरण करून या ठिकाणाला जागतिक दर्जाचे बुद्धिस्ट पर्यटन केंद्र बनवण्याचा आराखडा तयार करण्यात आला होता. या योजनेसाठी एमएमआरडीए कडून 10 करोड तर व्हीव्हीएमसी कडून 1 करोडचा निधी मंजूर करण्यात आलेला होता. परंतु बौद्धस्तुपाची सध्याची अवस्था पाहता या योजनेची अंमलबजावणी करण्यात संबधित संस्थांना अपयश आल्याचा निदर्शनांस येत आहे.

आज बौद्धस्तूपाच्या विटा दिवसेंदिवस ढासळत आहेत. स्तूपाचे प्रवेशद्वार, दिशादर्शक, माहितीफलक जीर्ण अवस्थेत आढळूत येत आहेत. अपुरी संरक्षण व्यवस्था आणि प्रवासी सुविधांचा अभाव यामुळे स्तूपाला भेट देणाऱ्या मोजक्या प्रवाशाना त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी बौद्धस्तूपाला भेट देणाऱ्या लोकांची संख्या वर्षोनुवर्षे खुंटत चालली आहे. याबाबत विचारणा केली असता, पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारीत हा परिसर असल्याने आम्हाला काही करता येत नाही असे मत वसई विरार महानगर पालिकेच्या प्रवक्त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर मांडले होते. यामुळे नालासोपाऱ्यातील बौद्धस्तूपाच्या संरक्षण आणि संवर्धनाची योजना केवळ सरकारी कचेऱ्या आणि कागदपत्रांमध्येच अडकून पडली आहे कि काय असा अशी शंका समोर दिसून येते. असे असल्यास इतिहासप्रेमी आणि बौद्धधर्मीयानी संबधित शासकीय संस्थांकडे पाठपुरावा करून शहरातील या बुद्धिस्ट ऐतिहासिक वास्तूचे संवर्धन करणं हि आजच्या काळाची गरज बनली आहे.