काय आहे मोटर वाहन कायद्यातील तरतुदी/वाहन नियम मोडल्यास दहापट दंड नवीन सुधारणांसह कायदा लागू जाणून घेऊया संपूर्ण लेखात.
काय आहे मोटर वाहन कायद्यातील तरतुदी/वाहन नियम मोडल्यास दहापट दंड नवीन सुधारणांसह कायदा लागू जाणून घेऊया संपूर्ण लेखात.

काय आहे मोटर वाहन कायद्यातील तरतुदी/वाहन नियम मोडल्यास दहापट दंड नवीन सुधारणांसह कायदा लागू जाणून घेऊया संपूर्ण लेखात.

ॲडव्होकेट अंकिता रा जयसवाल सिविल & क्रिमिनल कोर्ट वरुड, अमरावती 

काय आहे मोटर वाहन कायद्यातील तरतुदी/वाहन नियम मोडल्यास दहापट दंड नवीन सुधारणांसह कायदा लागू जाणून घेऊया संपूर्ण लेखात.
काय आहे मोटर वाहन कायद्यातील तरतुदी/वाहन नियम मोडल्यास दहापट दंड नवीन सुधारणांसह कायदा लागू जाणून घेऊया संपूर्ण लेखात.

ट्राफिक चे काही बेसिक नियम
1) डावीकडून चालणे: जेव्हा हि आपण रस्त्याने प्रवास करत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेऊन घ्या कि आपण नेहमी रस्त्याच्या डाव्या बाजूला आपले वाहन चालवावे. कारण समोरून येणारे वाहन हे तुमच्या विरुद्ध बाजूने येत असते. आपण जर आपली बाजू सोडून दुसऱ्या बाजूने वाहन चालविले तर आपला अपघात होण्याची शक्यता असते. त्यासाठी आपण डाव्या बाजूनेच आपले वाहन सुरक्षितरित्या चालवावे.

2) डावीकडे वळणे: वाहने चालविताना जर आपल्याला डाव्या बाजूला वळायचे असेल तर आपण आपले वाहन रस्त्याच्या डाव्या बाजूला घ्या त्यांनतर आपल्या गाडीचे डाव्या बाजूचे इंडीगेटर सुरु करून त्यानंतर डावीकडे वळण घ्या जेणेकरून तुमच्या पाठीमागे असणाऱ्या वाहनाला कळेल कि तुम्हाला डावीकडे वळायचे आहे, त्यामुळे तो स्वतःच्या वाहनावर नियंत्रण ठेवेल आणि यामुळे आपण आपला होणारा अपघात टाळू शकता.

3) उजवीकडे वळणे: वाहने चालविताना जर आपल्याला उजव्या बाजूला वळायचे असेल तर आपण आपले वाहन रस्त्याच्या उजाव्या बाजूला घ्या त्यांनतर आपल्या गाडीचे उजव्या बाजूचे इंडीगेटर सुरु करून त्यानंतर उजवीकडे वळण घ्या जेणेकरून तुमच्या पाठीमागे असणाऱ्या वाहनाला कळेल कि तुम्हाला उजवीकडे वळायचे आहे, त्यामुळे तो स्वतःच्या वाहनावर नियंत्रण ठेवेल आणि यामुळे आपण आपला होणारा अपघातही टाळू शकता.

4) ओव्हरटेक करणे: बरेचदा आपण वाहन चालवित असतांना घाईत एखाद्या वाहनाला मागे टाकण्याचे प्रयत्न करत असतो. कधी कधी असे करणे आपल्या जीवावर सुद्धा बेतू शकते.ज्यामुळे आपला अपघात होऊन आपल्याला दुखापत होण्याची शक्यता असते. त्यासाठी नेहमी वाहन चालवित असताना ओव्हरटेक करतेवेळी आपण उजव्या बाजूनेच ओव्हरटेक करावा तेही समोरचे वाहन येत नसताना. जेणेकरून आपल्याला दुखापत होणार नाही.

5) जेव्हा कोणी आपल्याला ओव्हरटेक करत असेल: प्रवास करत असताना जेव्हा आपल्याला कोणी ओव्हरटेक करत असेल तेव्हा आपण आपल्या वाहनाची गती कमी ठेवावी. जेणेकरून त्या मागील वाहनाला समोर जाण्यासाठी रस्ता मिळेल आणि अपघात होण्याची शक्यता कमी होईल.

6) योग्य अंतर ठेवणे: वाहन चालवत असतांना समोरील वाहनात आणि तुमच्या वाहनात योग्य ते अंतर ठेवा. जेणेकरून तुमच्या आणि समोरील वाहनाची टक्कर होणार नाही आणि अपघातास टाळा बसेल.

7) होर्न न वाजवणे: रस्त्याने प्रवास करत असताना बरेच ठिकाणी “नो होर्न” असे लिहिलेलं असते. त्या भागात आपण आपल्या वाहनाचा होर्न वाजवू नये. (उदा. दवाखान्याजवळ, शाळेजवळ)

नवीन मोटार वाहन कायद्यातील तरतुदी: 1 सप्टेंबरपासून नवा कायदा लागू देशात 1 सप्टेंबर रोजी संशोधित मोटर वाहन कायदा 1988 लागू करण्यात आला. नवीन कायद्यात कोणत्या तरतुदी आहेत आणि किती चलान लागणार हे या लेखात मी आपण सर्वांना सांगत आहे, त्यासाठी आपण हा लेख जास्तीत जास्त शेअर करावा तसेच माझ्याशी जोडण्यासाठी माझ्या फेसबुक पेज लीगल अवेरनेस टॉक बाय एडवोकेट अंकिता रा जयसवाल ला भेट द्या तसेच सामाजिक व कानूनी अपडेट माहित करण्यासाठी माझ्या nyaykagyan.blogspot.com ला भेट द्या.

मोटार वाहन कायदा नियमात आणि त्यांचे उल्लंघन केल्यावर होणाऱ्या दंडात्मक कारवाईत बदल करण्यात आले आहेत. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कडक कारवाई करण्याच्या दृष्टीने हे बदल करण्यात आले आहेत.
ड्रायव्हिंग लायसन्स सोबत नसेल तर पाचशे रुपयांऐवजी दसपट म्हणजे तब्बल पाच हजार रुपये दंड मोजावा लागणार आहे. दारु पिऊन गाडी चालवणाऱ्या चालकांकडून दोन हजार रुपये दंड वसूल केला जात होता, तोही आता दहा हजार रुपयांवर नेण्यात आला आहे.
अल्पवयीन मुलांना गाडी दिल्यास तुरुंगवास: वाहतुकीचे नवे नियम लागू करण्याबाबत विधेयकाला संसदेने मंजुरी दिली. अल्पवयीन मुलांनी गाडी चालवताना अपघात घडला, तर त्याच्या किंवा तिच्या पालकांना तीन वर्ष तुरुंगवासाची तरतूद आहे. त्याचबरोबर त्या वाहनाची नोंदणीही रद्द करण्यात येईल.
रुग्णवाहिका, अग्निशमन दल यासारख्या आपत्कालीन वाहनांना रस्ता दिला नाही, किंवा पात्र नसतानाही गाडी चालवली, तर दहा हजार रुपये दंड होऊ शकतो. भरधाव वेगाने गाडी चालवल्यास एक ते दोन हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे.

काय आहे नवीन नियम जाणून घेऊया
1. विनातिकीट प्रवास केल्यास पाचशे रुपये दंड
2. अधिकाऱ्यांचा आदेश न मानल्यास दोन हजार रुपये दंड
3. ड्रायव्हिंग लायसन्स नसताना गाडी चालवल्यास पाच हजार रुपये दंड
4. अपात्र असताना वाहन चालवल्यास दहा हजार रुपये दंड
5. भरधाव वेगाने गाडी चालवल्यास एक हजार रुपये दंड
6. धोकादायक पद्धतीने वाहन चालवल्यास पाच हजार रुपये दंड
7. दारु पिऊन गाडी चालवल्यास दहा हजार रुपये दंड
8. ओव्हरस्पीड किंवा रेसिंग केल्यास पाच हजार रुपये दंड
9. वाहन परवान्याचे नियम तोडल्यास 25 हजारांपासून एक लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद
10. वाहनात अतिरिक्त सामान भरल्यास दोन हजार रुपयांहून जास्त दंड
11. वाहनाच्या क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्यास प्रत्येकामागे एक हजार रुपये दंड
12. सीटबेल्ट न लावल्यास एक हजार रुपये दंड
13. स्कूटर किंवा बाईकवर दोनपेक्षा जास्त व्यक्ती बसल्यास दोन हजार रुपये दंड आणि तीन महिन्यांसाठी लायसन्स रद्द
14. हेल्मेट न घातल्यास एक हजार रुपये दंड आणि 3 महिन्यांसाठी लायसन्स रद्द
15. अँब्युलन्स, अग्निशमन दल यासारख्या आपत्कालीन वाहनांना रस्ता न दिल्यास दहा हजार रुपये दंड
16. इन्शुरन्स नसलेलं वाहन चालवल्यास दोन हजार रुपये दंड
17. अल्पवयीन पाल्याने गाडी चालवताना अपघात झाल्यास पालकांना तीन वर्ष तुरुंगवास आणि वाहनाची नोंदणीही रद्द.

मोटार वाहन कायद्यातील सुधारणेनुसार नव्या शिक्षा कोणत्या?
01) चारचाकी गाडी चालवताना सीटबेल्ट लावला नसल्यास आधी केवळ 100 रूपये दंड आकारला जात होता. आता हा दंड 1000 रूपये करण्यात आलाय.
02) दुचाकी चालवताना हेल्मेट घातला नसल्यास आधी केवळ 100 रूपये दंड आकारला जात होता. आता 1000 रूपये दंड आणि तीन महिन्यांपर्यंत वाहन परवाना रद्द करण्यता येईल.
03) अॅम्ब्युलन्ससारख्या आपत्कालीन वाहनांचा रस्ता अडवल्यास 10 हजार रूपये किंवा त्याहून दंड किंवा तीन महिन्यांचा तुरुंगवासाची शिक्षा होईल किंवा या दोन्ही शिक्षाही ठोठावल्या जातील. याआधी या गुन्ह्यासाठी कोणतीही शिक्षा नव्हती.
04) वाहन चालवताना परवाना नसेल तर 5 हजार रूपये किंवा त्याहून अधिक दंड किंवा 3 महिन्यांचा तुरूंवास किंवा दोन्ही शिक्षा होतील. हाच गुन्हा पुन्हा केल्यास 10 हजार रूपये किंवा त्याहून अधिक दंड किंवा एक वर्षांची शिक्षा किंवा दोन्ही शिक्षा होतील.परवाना रद्द झाला असतानाही वाहन चालवल्यास 10 हजार रूपये किंवा त्याहून अधिक किंवा 3 महिन्यांचा तुरूंगवास किंवा दोन्ही शिक्षा होतील.
05) भरधाव गाडी चालवल्यास 5 हजार रूपये किंवा त्याहून अधिक किंवा 3 महिन्यांचा तुरूंगवास किंवा दोन्ही शिक्षा होतील.
06) अल्पवयीन व्यक्तीनं गुन्हा केल्यास वाहनाच्या मालकाला दोषी ठरवलं जाईल आणि 25 हजार रूपये दंडासोबत 3 वर्षांचा तुरूंवास होईल. शिवाय, गाडीची नोंदणी एक वर्षासाठी रद्द केली जाईल. तसेच, अल्पवयीन आरोपी 25 वर्षांचा होईपर्यंत त्याला वाहन परवाना दिला जाणार नाही.
07)  मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवल्यास 10 हजार रूपये किंवा त्याहून अधिक दंड किंवा 6 महिन्यांचा तुरूंगवास किंवा दोन्ही शिक्षा होतील. मात्र, हाच गुन्हा पुन्हा केल्यास 15 हजार रूपये किंवा त्याहून अधिक दंड किंवा 2 वर्षांचा तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा होतील.
08)वाहन चालवताना सिग्नल तोडल्यास 10 हजार ते 5 हजार रूपये दंड किंवा 6-12 महिने तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा होतील. मात्र, हाच गुन्हा पुन्हा केल्यास 10 हजार रूपये दंड किंवा 2 वर्षांचा तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा होतील.
09) मोठमोठ्यानं हॉर्न वाजवल्यास पहिल्यांदा एक हजार रूपयांचा दंड आणि पुन्हा हाच गुन्हा केल्यास 2 हजार रूपयांचा दंड आकारला जाईल. याआधी यासाठी शिक्षेची कोणतीही तरतूद नव्हती.
10) वाहनाला विमा संरक्षण नसल्यास दोन हजार रूपयांपर्यंत दंड किंवा तीन महिन्यांचा तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा होतील. मात्र, हाच गुन्हा पुन्हा केल्यास चार हजार रूपयांपर्यंत दंड किंवा तीन महिन्यांचा तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा होतील.
11) वाहन चालवताना मोबाईलवर बोलल्यास, चुकीच्या पद्धतीनं ओव्हरटेकिंग केल्यास किंवा रस्त्याच्या विरूद्ध दिशेने वाहन चालवल्यास एक हजार ते पाच हजार रूपये दंड किंवा 6-12 महिने तुरूंगवास किंवा दोन्ही शिक्षा होतील. हाच गुन्हा पुन्हा केल्यास 10 हजार रूपये दंड किंवा दोन वर्षांचा तुरूंगवास किंवा दोन्ही शिक्षा होतील.
अशा प्रकारे नवीन ट्रॅफिक रूल्स मध्ये बदल करण्यात आलेली असून हा लेख जागरूकतेसाठी मी आपण सर्वांसाठी लिहिलेला आहे आपण सर्वांना आवडल्यास नक्की शेअर करा व कमेंट द्वारे आपली प्रतिक्रिया कळवा!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here