कामगारांचा एक महिन्याचा पगार भीक म्हणून देणार: युवा स्वाभिमान पक्ष व जय भवानी कामगार संघटना.

संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी

राजुरा:- आज दिनांक ०८/०४/२०२१ रोजी वेकोलि सब एरिया बल्लारशा, क्षेत्रांतर्गत राजुरा येथील कार्यालयात व जी.आर.एन कंपनी येथे कामगारांच्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी युवा स्वाभिमान पक्ष व जय भवानी कामगार संघटनेने आज अभिनव आंदोलन केले गेल्या एक वर्षांपासून स्थानिक कामगारांचे मेस बिल च्या नावावर अनेक महिने बेकायदेशीररित्या कापलेल्या 5000 रुपये प्रति महिनाप्रमाणे पैसे परत केले नाहीत आजपर्यंत अनेकदा बैठकी झाल्या प्रत्येक बैठकीमध्ये या महिन्यात पैसे परत करतो या महिन्यात पैसे परत करतो असे उत्तर कंपनीकडून देण्यात आले अखेर आज जय भवानी कामगार संघटनेकडून वेकोली प्रशासन व कंपनी यांना पैसे कमी असल्याने एक महिन्याचा पगार कामगारांनी देऊ केला अर्थात तो त्यांनी घेतला नाही परंतु वेकोलि झाली भिकारी कामगारांच्या पैशांवर डल्ला मारी अशा घोषणाबाजी करत आज सब एरिया वेकोली तालुका राजुरा व जी आर एन कंपनी येथे जय भवानी कामगार संघटनेचे सुरज ठाकरे व सर्व कामगारांनी आंदोलन केले. या आंदोलनांमध्ये दिलेल्या निवेदनामध्ये जी आर एन कंपनी व वेकोलि प्रशासनास कामगारांनी एक महिन्याचा पगार भिक म्हणून देण्याचा प्रस्ताव दिला आहे. याशिवाय कामगारांना किमान वेतना प्रमाणे वेतन मिळावे. पीएफ व बोनस बरोबर मिळावे. या मागण्या व इतर मागण्यांचा उल्लेख दिलेल्या निवेदनामध्ये करण्यात आलेला आहे .या सर्व मागण्या दिनांक २०/०४/२०२१ पर्यंत पूर्ण न झाल्यास, काम बंद आंदोलन करण्यात येईल व साखळी उपोषण देखील वेकोली कार्यालयासमोर जयभवानी कामगार संघटनेतर्फे करण्यात येणार असल्याचा इशारा आज दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here