हिंगणघाट येथे सायकलच्या दुकानाला आग; लाखोचे नुकसान.
हिंगणघाट येथे सायकलच्या दुकानाला आग; लाखोचे नुकसान.

हिंगणघाट येथे सायकलच्या दुकानाला आग; लाखोचे नुकसान.

हिंगणघाट येथे सायकलच्या दुकानाला आग; लाखोचे नुकसान.
हिंगणघाट येथे सायकलच्या दुकानाला आग; लाखोचे नुकसान.

मुकेश चौधरी, प्रतिनिधी✒
हिंगणघाट:- शहरातील स्थानिक कारंजा चौक येथील ठाकरे सायकल स्टोर्स या सायकल दुकानाला आग लागुन लाखोचे नुकसान झाल्याची बातमी समोर आली आहे. हे दुकान शहरातील मुख्य बाजारपेठ मध्ये या दुकानाला काल सकाळी 11 एप्रील रोजी आग लागल्यानंतर हिंगणघाट नगर पालिकेच्या अग्नीशमन विभागाने आगीवर नियंत्रण मीळवल्याने सुदैवाने आग पसरली नाही आणि मोठे नुसकान झाले नाही. परंतु ठाकरे यांचे दुकानाची मात्र राखरांगोळी झाली.
 
हिंगणघाट शहरातील मुख्य कारंजा चौक येथील मुख्य बाजारपेठेत असलेले सुरेश उर्फ बंडु चंपतराव ठाकरे यांचे सायकल विक्री व दुरुस्तीचे दुकान आहे.आज दि.11 रोजी दुपारी 11 वाजता या संचारबंदीमुळे बंद असलेल्या दुकानातुन धुर निघतांना दिसला. प्रथमदर्शी लोकांनी दुकानाला आग लागल्याची माहिती त्वरीत दुकानाचे मालक सुरेश ठाकरे व हिंगणघाट नगर पालिकेच्या अग्नीशमन विभागाला आग लागल्याची माहीती दिली. अग्नीशमन विभागाने तातडीने आगीवर नियंत्रण मिळवुन पुढील अनर्थ टाळला. या आगीत दुकानातील नविन तसेच जुन्या सायकली, टायर, ट्युब, सायकलच्या फ्रेम, रींग, हवेचे काँप्रेसर व ईतर सुटे भाग व साहित्य जळुन खाक झाल्याने जवळजवळ लाखों रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सदर आग कशामुळे लागली याची माहीती मिळु शकली नाही, परंतु शार्ट सर्किट आग लागल्याची चर्चा आहे. पुढील तपास हिंगणघाट पोलिस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here