विवेक येमजेलवार भूगोल विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण.
✒मनोज खोब्रागडे✒
चंद्रपूर / गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली:- धानोरा येथील जीवनराव सीताराम पाटील मुनघाटे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी विवेक कवळू येमजेलवार यांनी भूगोल विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांचे वडील प्रबुद्ध हायस्कूल मुरखळा चक येथे शिक्षकेत्तर कर्मचारी म्हणून कार्यरत आहे.त्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, मार्गदर्शक प्रा.डॉ.लांजेवार ( धानोरा ) मित्रपरिवार यांना दिले आहे.त्यांनीं सेट परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल प्रबुद्ध हायस्कूल मुरखळा चक ता.चामोर्शी येथील मुख्याध्यापक, शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कौतुक व अभिनंदन केले.