यवतमाळ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे तरुणीचा तडफडून मृत्यु.
डॉक्टंरांनी उपचारात केलेल्या हलगर्जीपणामुळेच तरुणीचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला.

✒साहिल महाजन, यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी✒
यवतमाळ,दि.13 एप्रिल :- यवतमाळ जिल्हातुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आज कोरोना वायरस महामारीच्या काळात आरोग्य सेवा देणा-या डॉक्टरांची हलगर्जी पणाची अनेक बातम्या समोर येत आहे. अशीच एक बातमी यवतमाळ येथून समोर आली आहे.
भाग्यश्री जाधव वय 24 वर्ष रा. हिवळेश्वर, ता. माहूर, जि. नांदेड या तुरुणीच्या पित्ताशयात गाठ असल्यामुळे या गाठीची शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रिया झाल्यानंतर आठवडाभराने तरुणीचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. डॉक्टीरांनी उपचारात केलेल्या हलगर्जीपणामुळे तरुणीचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला असून, येथील अवधूतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.
मोठ्या प्रमाणात पोटदुखीचा त्रास होत असल्याने भाग्यश्रीला उपचारासाठी डॉ. विजय पोटे यांच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. वैद्यकीय तपासणीनंतर तिच्या पित्ताशयाच्या बाजूला गाठ असल्याचे निदान झाले होते. दोन एप्रिल रोजी भाग्यश्रीची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर तरुणीच्या प्रकृतीत मोठ्या प्रमाणात सुधारणाही होत होती. मात्र, शनिवारी सकाळी भाग्यश्रीच्या नाकात लावण्यात आलेली नळी हलल्याने ती वेदनेने तडफडू लागली. रुग्णालयात असलेले तिच्या नातेवाइकांनी डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचा-यांना आवाज दिला. पण रुग्णालयातील कर्मचारी येण्या अगोदरच भाग्यश्रीचा तडफडुन मृत्यू झाला. डॉक्टरांनी उपचारात केलेल्या हलगर्जीपणामुळेच तरुणीचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला. रुग्णालयात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नातेवाइकांनी अवधूतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून, पोलिस पुढील तपास करीत आहेत.