नागपुरमध्ये करोना वायरस बांधित रुग्णाची आत्महत्या, रेल्वे ट्रकजवळ मिळाला मृतदेह.

✒युवराज मेश्राम नागपुर जिल्हा प्रतिनिधी✒
नागपूर,दि.13 एप्रिल:- मध्ये मोठ्या प्रमाणात करोना वायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे आकड्यांवरुन दिसुन येत आहे. विदर्भात कोरोना वायरस बांधीत रूग्णांना रुग्णालयात बेड मिळत नसल्याचे अनेक लोक बोलत आहे. तर दुसरी कडे नागपुर येथे एका कोरोना वायरस बांधीत रुग्णांने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
नागपुर येथील एका करोना वायरस बाधित रुग्णाने आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सकाळी 10 वाजताच्या सुमारास पंचशीलनगरमधील मेहरे कॉलनी येथे उघडकीस आली. सुरेश महादेव नखाते वय 50 वर्ष रा. प्लॉट क्रमांक 148, सुयोगनगर, नागपूर असे मृतक रुग्णाचे नाव आहे. ते बागे मध्ये काम करायचे.
पोलिसांचा माहितीनुसार, सुरेश महादेव नखाते काही दिवसा पासून त्यांना सर्दी व खोकला होता. ते आजारी असल्यामुळे त्यांच्या पत्नी वर्षा नखाते यांनी सुरेश यांना करोना चाचणी करण्यास सांगितले. आणि सुरेश 10 एप्रिल घरून निघाले कोरोना चाचणी करण्यासाठी रुग्णालयात निघाले. ते यानंतर घरी परतलेच नाही. सुरेश यांच्या पत्नीने त्यांचा शोध घेतला असता ते कुठेच दिसून आले नाही.
त्यानंतर सुरेश यांचा पत्नी वर्षा ने नागपुर क्षेत्रातील अजनी पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली. अजनी पोलिसांनी सुरेश बेपत्ता असल्याची नोंद करुन शोध घेतला. पण सोमवारी सकाळी 10 वाजताच्या सुमारास मेहरे कॉलनीतील रेल्वेरुळाजवळ एका इसमाचा मृतदेह असल्याची माहिती सोनेगाव पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच सोनेगाव पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. मृतकाच्या खिशात पोलिसांना चिठ्ठी आढळली. ‘आजरपणाला कंटाळून आत्महत्या करीत आहे. माझ्या आत्महत्येस कुणीही जबाबदार नाही’, असे चिठ्ठीत लिहिले आहे. पोलिसांनी पंचनामा केला. याप्रकरणी सोनेगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.