विद्रोही आंबेडकरी कार्यकर्ते आणि, प्रसिद्ध चित्रपट अभिनेते, यांचे कोरोनामुळे निधन.

✒प्रशांत जगताप, प्रतिनिधी✒
नागपूर,दि.13 एप्रिल:- 14 एप्रिल भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्व संध्येला आंबेडकर चळवळीसाठी एक दुखाची बातमी समोर आली आहे. विख्यात आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आणि अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपट अभिनेते यांचे आज कोरोना वायरसने दुखद निधन झाले.

प्रसिद्ध कोर्ट चित्रपटा मध्ये प्रमुख भूमिका वटवणारे अभिनेते आणि आंबेडकरी चळवळीतील विद्रोही कार्यकर्ता म्हणून प्रसिद्ध विरा साथीदार यांचे आज कोरोनाशी लढताना निधन झाले. नागपुर येथील एम्स रुग्णालयात माघील काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. वीरा यांनी 19 मार्चला कोरोना लस घेतली होती आणि त्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाली होती.

विरा साथीदार यांचा जन्म वर्धा जिल्ह्यातील एका खेड्यात अतिशय गरीब कुटुंबात झाला. गरीबीचे चटके बघुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे क्रांतीकारी विचार आत्मसात करुन, वीरा साथीदार यांनी त्यांचे आयुष्य आंबेडकर चळवळीतील संघर्षात घालविले. नागपूर मध्ये काम करण्यासाठी आलेल्या वीरा साथीदार यांचे नाते आंबेडकरी चळवळीशी घनीष्ट जुळले. ते आज पर्यंत होते. ते न्याय, हक्क, अधीकारच्या शेकडो आंदोलनात त्यांचा सक्रिय राहून सहभागी होत होते. जातीवाद, अंधश्रद्धा यावर प्रहार करणारे बंडखोर कार्यकर्ता म्हणून त्यांचे व्यक्तित्व होते.

चैतन्य ताम्हाणे यांनी निर्माण केलेल्या प्रसिद्ध मराठी चित्रपट कोर्ट या चित्रपटात त्यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. हा चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत पोहचला होता. यानंतरही चळवळीशी संबंधित चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारली आहे. मात्र अभिनेता म्हणवून घेण्यापेक्षा आंबेडकरी कार्यकर्ता म्हणून ओळखले जाणे त्यांना आवडायचे. त्यांच्या अचानक निधनाने चळवळीचा विद्रोही आणि लढाऊ कार्यकर्ता हरवल्याची शोक भावना व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि बराच मोठा आप्तपरिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here