नागपुर येथे पोलिसाच्या घराला आग लावुन, कुटुंबीयांना जीवे मारण्याचा प्रयत्न.

✒युवराज मेश्राम नागपुर जिल्हा प्रतिनिधी✒
नागपूर,दि.15 एप्रिल:- नागपूर येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नागपुरातील पोलिस कर्मचाऱ्याची पत्नी आणि दोन मुलांना घरात बंद करुन घरावर रॉकेल टाकुन आग लाऊन पेटवुन देत जीवेनाशी ठार मारण्याच्या प्रयत्न करण्यात आल्याची बातमी मे सर्वी कडे खळबळ माजली.
नागपुर शहर पोलिस दलात कार्यारत असलेले राहुल चव्हाण हे वानाडोंगरीतील आयटीआय कोव्हिड सेंटरला तैनात आहेत. ते नागपुर परीसरातील एसआरपीएफ कॅम्पजवळील ज्ञानदीप कॉलनीलगतच्या सप्तकनगर येथे आपल्या पत्नी पूनम, मुलगा राघव वय 6 वर्ष आणि केशव वय 3 वर्ष यांच्यासह वास्तव्यात आहे. मंगळवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास अज्ञात दोन आरोपींनी राहुल यांच्या घरावर रॉकेल टाकूण आग लावली. त्यावेळी घरात राहुलची पत्नी पूनम आणि दोन्ही मुले होते.
घराला लागलेल्या आगीमुळे, घरात सर्वीकडे धूळ निघत होता. या धुळामुळे पूनम राहुल चव्हाण यांना झोपेतून जाग आली. पूनम यांनी साहस दाखवत आपल्या दोन्ही मुलांना बेडरूममधून काढून स्वयंपाक रुम मध्ये घेउन गेले. आणि मामाला फोन करून स्वतः घराला लागलेली आग विझविण्याचा प्रयत्न केला. काही वेळेत मामा तेथे आले आणि दार तोडून तिघांनाही सुखरुप बाहेर काढले. या प्रकरणी नागपुर येथील एमआयडीसी पोलिसांनी अज्ञात घरारा आग लावणा-या आरोपींवर गुन्हा दाखल केला. घरा शेजारी लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे वीडियो फुटेज जप्त केले. त्या फुटेज मध्ये दोन आरोपी घराच्या दरवाज्यातून रॉकेल ओतून आग लावताना दिसत आहेत. त्या दोघांची ओळख पटविण्याचे काम पोलिस करीत आहेत.
नागपुर पोलिस विभागात कार्यारत असलेले राहुल चव्हान यांचे पूनम बरोबर दुसर लग्न आहे. त्याच्या पहिल्या पत्नीसोबत नेहमी वाद होत असल्याने, या वादातून राहुल आणि पहिल्या पत्नीने 2012 मध्ये घटस्फोट झाला होता. त्याही दिशेने पोलिस तपास करीत आहेत. तसेच राहुल भांडखोर स्वभावाचा असल्यामुळे त्याचा अनेकांशी वाद झाला आहे. त्यामुळे कुणी भांडणातून वचपा काढण्याचा प्रयत्न केला का? याचाही तपास पोलिस करीत आहेत.