समानता प्रस्थापित करण्यासाठी बाबासाहेबांचे विचार प्रेरक: डॉ मंगेश गुलवाडे.

55

समानता प्रस्थापित करण्यासाठी बाबासाहेबांचे विचार प्रेरक: डॉ मंगेश गुलवाडे.

भाजप नेत्यांनी साजरी केली डॉ आंबेडकर जयंती.

समानता प्रस्थापित करण्यासाठी बाबासाहेबांचे विचार प्रेरक: डॉ मंगेश गुलवाडे.
समानता प्रस्थापित करण्यासाठी बाबासाहेबांचे विचार प्रेरक: डॉ मंगेश गुलवाडे.

✒मनोज खोब्रागडे✒.
चंद्रपूर गडचिरोली जिल्हा गडचिरोली
चंद्रपूर :- संविधान निर्माते, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांना समान अधिकार बहाल केले. ज्यामुळे देशात लोकशाही प्रस्थापित झाली,ही लोकशाही आणखी मजबूत करून समानता प्रस्थापित करायची असेल तर डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आजही प्रेरक आहेत,असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे महानगर जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे यांनी केले.

ते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त गोलबाजार येथील डॉ आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करून आदरांजली अर्पण करीत असताना बुधवार(14एप्रिल)ला बोलत होते.
यावेळी महापौर राखीताई कंचर्लावार,स्थायी समिती सभापती रवी आस्वानी, मनपा सभागृह नेते संदीप आवारी, महामंत्री राजेंद्र गांधी, ब्रिजभूषण पाझारे, रवींद्र गुरनुले, अनु.जाती मोर्चा महानगर अध्यक्ष धम्मप्रकाश भस्मे, भाजपा सचिव रामकुमार आक्कापेललीवार, झोन सभापती राहुल घोटेकर, नगरसेविका सविता कांबळे, वंदना जांभुळकर, शीतल गुरनुले, खुशबू चौधरी, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष विनोद शेरकी, पूनम तिवारी, तुषार मोहुर्ले, अनु.जाती मोर्चा महामंत्री निलेश हिवराळे, सागर भगत, राजेश थुल, भाजपा सचिव स्वप्नील कांबळे, राहुल बोरकर, यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
डॉ गुलवाडे म्हणाले, डॉ आंबेडकरांनी प्रदीर्घ संघर्ष करून समाजाला न्याय दिला. त्यांनी दिलेली शिकवण, शिका, संघर्ष करा, संघटित व्हा यावर अंमल करणे गरजेचे आहे.असे ते म्हणाले.