जालना येथील मोतीतलावात गौतम बुद्धाचा पुतळा बसवा. केंद्रीय राज्यमंत्र्यांचा जिल्हाधिका-यांना आदेश.

51

सतीश मस्के जालना जिल्हा प्रतिनिधी✒
जालना,दि.16 एप्रिल:- जालना शहरातील प्रसिद्ध संभाजी उघान येथील मोतीतलावात समस्त मानवजातीला सत्य, अहिंसा, प्रेम, शांतीची शिकवण देणारे तथागत गौतम बुद्धाचा पुतळा हैदराबाद येथील प्रसिद्ध हुसेन सागराचा धर्तीवर बसवण्यात यावी अशी तम्माम बौद्ध धर्मीयांची मागणी अनेक दिवसा पासून आहे. याबाबत जालना नगरपालिकेला पुष्कळदा अर्ज, निवेदन आणि विनवण्या करण्यात आल्या होतो. मात्र या प्रश्नी कुठलीही करवाई होत नाही अस दिसत होते.

भारत सरकारचे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांना याबाबत माहिती आणि निवेदन देण्यात आले होते. त्यावर रामदास आठवले यांनी याबाबत जालना जिल्हाधिकारी यांना तथागत गौतम बुद्धाचा पुतळा संदर्भात उचीत करवाई करण्याचा आदेश दिला.

जालना जिल्हातील जनता दरबार सामाजिक संघटना संस्थापक अध्यक्ष राजेश म्हस्के यांचा बरोबर बौद्ध समाजातील अनेक लोकाची मागणी होती, यामुळे हे निवेदन देण्यात आले होते. त्यामुळे मोती तलावात बौध्द मुर्ती बसवण्या संदर्भात दिलेल्या निवेदनाची दखल केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी तातडीने घेतली, जालना जिल्हाधिकारी यांना तात्काळ योग्य कार्यवाही कराण्याचे आदेश दिले.