कळमेश्वर शहरासह तालुक्यात पहिल्या दिवशी कडकडीत बंद पोलिसांचा जबरदस्त ग्रस्त.
विनाकारण घराबाहेर पडल्यास दंडात्मक कारवाई.

✒युवराज मेश्राम नागपुर जिल्हा प्रतिनिधी✒
नागपूर,कळमेश्वर दि.16 एप्रिल:- शहरासह तालुक्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून, संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात 1 मे रोजीच्या सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या जाहीर केलेल्या आवाहनानुसार कडकडीत बंद पाळण्यात आला. महाराष्ट्र राज्य कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता शासनाच्या वतीने कळमेश्वर तालुक्यात धापेवाडा, कोहळी, मोह्पा, गोंडखैरी व तालुक्यातील सर्व ठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात आले. यात दवाखाने वगळता किराणा दुकान मेडिकल स्टोअर्स भाजीपाला बाजार पेठ वगळता तहसील कार्यालय पंचायत समिती कार्यालय बंद ठेवण्यात आले. त्याचप्रमाणे एमआयडीसी चौक ब्राह्मणे फाटा चौक येथील सर्व दुकाने व बाजार चौकातील सर्व दुकाने बंद करण्यात आली.
नगर परिषद क्षेत्रातील ग्रामीण भागांमधून सुद्धा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला तेलकामठी, गोंडखैरी, कोहळी, मोहपा व इतर परिसर आवश्यक सेवा वगळता कडकडीत बंद पाळण्यात आले. सरकारच्या वतीने नियमाचे पालन करण्याचे कळमेश्वर येथील तहसीलदार सचिन यादव व पोलिस स्टेशनचे आसिफ राजा शेख यांनी सांगितले त्याचप्रमाणे रस्त्यावर नागरिक सुद्धा कमी प्रमाणात आढळले सकाळी 7 पासून गजबजलेल्या दुकाने व पडलेली दिसत होती. शासनाने दिलेल्या जनतेने आदेशाचे पालन करावे म्हणून येथील ठाणेदार आरिफ राजा शेख यांनी सकाळपासूनच तालुक्यातील शहरांमध्ये स्वतः जाऊन दुकाने बंद करण्याचे आव्हान करण्यात आले. जनतेने शासनाच्या आव्हानावर प्रतिसाद देत दुकाने बंद करण्यात आली. त्याचप्रमाणे तोंडाला मास लावावे, सुरक्षित अंतर ठेवावे, सॅनिटायझर वापरून स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्यावी असे आवाहन तहसिलदार सचिन यादव व पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आरिफ राजाशी शेख यांनी सांगितले.