मुंबईतील कोविड रुग्णालयातील ऑक्सिजन साठा संपला, करोना बांधीत रुग्णाला हलवण्यात आल.

✒️नीलम खरात, प्रतिनिधी✒️
मुंबई,दि.17 एप्रिल:- मुंबईत कोरोना वायरसच्या मोठ्या प्रमाणात विस्फ़ोट सुरु आहे. दर रोज हजारो कोरोना वायरस बांधीत रुग्ण समोर येत आहे. तर दुसरीकडे शेकडोच्या वर रुग्ण मयत होत आहे. त्यामूळे संपुर्ण आरोग्य यंत्रणेवर तान येत आहे. त्यामूळे ते हतबल झाल्याचे दिसुन येत आहे. मुंबई महानगर पालिकेच्या रुग्णालयातील सेवा ऑक्सिजन अभावी बाधीत झाल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई पश्चिम उपनगर मधिल भगवती रुग्णालयात ऑक्सिजनचा पुरवठा शुक्रवारी झालाच नाही. त्यामुळे व्हेंटिलेटरवर आणि आयसीयूमध्ये असलेल्या अनेक कोरोना वायरस बांधीत रुग्णांना महानगर पालिकेच्या इतर रुग्णालयात हलवण्यात आलं. आज राज्यात मोठ्याप्रमाणात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे आणि मुंबई महानगर पालिका कार्यक्षेत्रात असलेल्या रुग्णालय बाधित होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
मुंबई महापालिकेच्या कोवीड 19 रुग्णालयातील कोरोना वायरस बांधीत रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा बंद झाला, तर त्यांच्या जीवावर बेतू नये म्हणून हॉस्पिटल प्रशासनाने त्यांना शुक्रवारीच इतर दुस-या रुग्णालयात हलवलं. त्या पैकी आयसीयूमध्ये असलेल्या 6 कोरोना वायरस बांधीत रुग्णांना कांदरपाडा येथील जम्बो कोविड 19 केअर सेंटर, 11 रुग्णांना शताब्दी रुग्णालय तर 23 रुग्णांना दहिसर येथील जंबो कोविड सेंटर आणि 2 कोरोना वायरस बांधीत रुग्णांना खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.
मुंबई महानगर पालिकेच्या भगवती रुग्णालयात अजूनही 49 करोना वायरस बांधीत रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज जर ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या कंपनीने ऑक्सिजनचे सिलेंडर पुरवले नाहीत तर याही रुग्णांना इतर रुग्णालयात हलवलं जाण्याची शक्यता आहे. खरंतर शुक्रवारी दुपारी 15 जणांना आधी हलवण्यात आलं होतं. पण रात्री जेव्हा आणखी ऑक्सिजन सिलेंडरचा बंदोबस्त झाला नाही तेव्हा मात्र आणखी 27 रुग्ण भगवती रुग्णालयातून बाहेर काढण्यात आले आणि आता तर या रुग्णालयात कोविड रुग्णांना दाखल करून घेतलं जात नाही आहे.