गायिका मंगल रोकडे डेमोक्रॅटिक रिपाई मुंबई उपाध्यक्षपदी नियुक्ती
मुंबई दि17 (प्रतिनिधी):- लवंगी मिरची सातारची फेम सुप्रसिद्ध गायिका व गीतकार मंगलताई रोकडे यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षाच्या मुंबई प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
रिपब्लिकन महिला नेत्या भीमकण्या राणिताई माकणीकर यांच्या शिफारशी हुन महाराष्ट्र राज्याच्या सुप्रसिद्ध गायिका लवंगी मिरची लावणी फेम मंगल रोकडे यांची निवड करण्यात आली असून, मंगल रोकडे यांनी आपल्या गीत गायनातून सामाजिक प्रबोधन करून आंबेडकरी चळवळीत भरीव असे योगदान दिले आहे.
राष्ट्रीय महासचिव डॉ राजन माकणीकर व राज्य महासचिव कॅप्टन श्रावण गायकवाड यांच्या प्रमुख उपस्तिथीत पक्षप्रमुख कनिष्क कांबळे यांच्या हस्ते मंगल रोकडे यांना नियुक्ती पत्र देवुन सन्मान करण्यात आला.
सदर निवड ही फार महत्वपूर्ण असून संधीच सोन करून दाखवणार व महिलांवरील होणारे अन्याय अत्याचार तसेच महिला सक्षमीकरणा करीता अभ्यासू, उच्चशिक्षित, तरुण तडफदार नेतृत्व कनिष्क कांबळे यांच्या प्रभावी नेतृवात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षाच्या माध्यमातून समाजा व राजकारणात महिलांना सन्मान मिळवून देण्यासाठी आणि त्यांचे सर्वांगीण प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे मत मंगल रोकडे यांनी यावेळी मांडले.
आंबेडकरी चळवळीचा नवा झंझावात आगामी सत्ताकरणात विशेष असे स्थान निर्माण करणार असून आंबेडकरी विचारांच्या महिलांनी चूल आणि मूल अस मर्यादित न राहता राजकारणात सक्रिय व्हावे यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षात सहभागी होण्याचे आवाहन ही नाव नियुक्त मुंबई प्रदेश उपाध्यक्ष मंगल ताई रोकडे यांनी केले.