वर्धा जिल्हात मांत्रिकाने केला मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरण.

✒आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
वर्धा,दि.18 एप्रिल:- वर्धा जिल्हात एका मांत्रीकाने एका मुलीवर लैंगिक अत्याचार काही दिवसापुर्वी केल्या होता. त्यामुळे संपुर्ण वर्धा जिल्हात खळबळ माजली होती. अंधश्रद्धेची नाळ किती खोलवर रुजलेली आहे यांची प्रचीती आली होती.
हिंगणघाट तालुक्यातील एका तरुणीला पैशाचे पाऊस पाडण्याच अमिष दाखवुन, मी तुझावर 80 कोटी रुपयाच्या नोटांचा पाऊस पडतो. अशा अनेक भूलथापा देऊन अनेक दा लैंगिक अत्याचार करणाऱ्या फरार मांत्रिकाला भंडारा येथून पोलिसांनी अटक केली आहे. भानामती करुन पैशांचा पाऊस पाडण्याच्या भूलथापा देणाऱ्या मांत्रिकाने युवतीला विवस्त्र करीत अनेकदा मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी समोर आला.
हिंगणघाट तालुक्यातील येरणगाव येथील एका 21 वर्षीय तरुणींचे वडिल मयत झाले आहे. त्यामूळे तीची आई आणि नातलग तिचा सांभाळ करत होते. परीवाराची आर्थिक स्थिती हलाखीची असल्याने, शिक्षण घेण्याची इच्छा असल्याने ती वर्धेत शिक्षण घेण्यासाठी आली होती. पिढीत मुलीचा आई आणि काकाच्या संपर्कात बालू मंगरूळकर हा व्यक्ती आला. त्याने त्यांना मोठ मोठे आमिष दाखवले आणि मांत्रिक बदल सांगितले. आपल्यावरील कर्ज फेडता येईल, आपण मालामाल होवू या आमिषाला पीडितेची आई आणि काका बळी पडले.
पीडितेला भूलथापा देत हिंगणघाट तालुक्यातील ऐरणगाव, नांदगाव येथील शेत शिवारातील निर्जनस्थळी नेवुन विवस्त्र करून शरिराला लिंबू लावण्याचा प्रकार केला गेला. पीडितेने याला विरोध करून तेथून पळ काढला. मात्र, तिच्या आईने तिला धमकावून पुन्हा पीडितेला तयार करून वारंवार असे अनेक प्रयोग केले गेले.
अर्थात या सर्व त्रासाला कंटाळून पीडित 21 वर्षीय तरुणी बेपत्ता झाली होती.नंतर पोलिसांत तक्रार दिल्या नंतर पोलीस तपासात हा सर्व प्रकार उघडकीस आला होता.
याप्रकरणी मांत्रिकाला 9 दिवसांनी पोलिसांनी अटक केली आहे. दिनेश उर्फ सर्वोत्तम झाडे असे आरोपीचे नाव आहे. याआधी 7 जणांना याप्रकरणी अटक केली होती. आता या भामट्यांचा म्होरक्या सर्वोत्तम झाडेलाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.