अमोल कोल्हे यांच्या पाठपुराव्यामुळे कोविड पेशंटचे 66300 रुपये वाचले.
अमोल कोल्हे यांच्या पाठपुराव्यामुळे कोविड पेशंटचे 66300 रुपये वाचले.

अमोल कोल्हे यांच्या पाठपुराव्यामुळे कोविड पेशंटचे 66300 रुपये वाचले.

अमोल कोल्हे यांच्या पाठपुराव्यामुळे कोविड पेशंटचे 66300 रुपये वाचले.
अमोल कोल्हे यांच्या पाठपुराव्यामुळे कोविड पेशंटचे 66300 रुपये वाचले.

✒ विशाल सुरवाडे ✒
जळगाव जिल्हा प्रतीनिधी
जळगाव:- रावेर येथील शेतकरी रमेश कल्लू पवार व त्यांचे वडील कल्लू लखु पवार हे शिवम कोविड सेंटर, जळगाव येथे ऍडमिट असुन हॉस्पिटलकडुन त्यांना अनुक्रमे 109000 /- रुपये व 68800 /- रुपये असे एकूण 177800 /- रुपये बिल आकारण्यात आले होते. त्यापैकी 30000 /- रुपये पेशंटने जमा केले असुन आता पेशंटकडे 147800 /- रुपये बिल मागणी करण्यात येत होते. असे त्यांनी त्यांना सांगितले. सदर रक्कम जास्त वाटत असल्यामुळे त्याबाबद्दल शहानिशा करावी व पेशंटकडून योग्य बिल रक्कम हॉस्पिटलने घ्यावी यासाठी प्रयत्न करावा अशी विनंती अमोल कोल्हे यांना केली. नंतर कुणाल रमेश पवार यांचा अमोल कोल्हे याना कॉल केला. त्यांच्याकडून त्यांनी सर्व माहिती जाणून घेतली व बिलाचे फोटो मागविले डॉक्टरांचा नंबर घेतल . सदर बिलाचे आकलन करता खरोखरच शासकीय नियमांपेक्षा बिल जास्त आकारले आहे असे दिसुन येताच, संबंधित डॉक्टरांना याबाबत विचारणा केली आणि बिल कमी करण्याबाबत विनंती केली, त्यांनीही बिल कमी करण्याबाबत होकार दर्शविला. नंतर शासनाने शिवम कोविड सेंटर साठी नेमलेले ऑडिटर विजय रायसिंग साहेब यांना कॉल करून याबाबत सांगितले पण ते सुट्टीवर व बाहेरगावी असल्याने त्यांनी अमोल कोल्हे याना त्यांचे असिस्टंट प्रतीक हमीरकर यांच्याशी संपर्क करण्याचे सांगितले तसेच प्रतीक हमीरकर यांना देखील कॉल करून योग्य त्या सूचना दिल्या.

प्रतीक हमीरकर यांनी दोन्ही बिलांचे ऑडिट करून त्यात अनुक्रमे 28000/- रुपये व 37500/- रुपये असे एकूण 65500/- रुपये जास्त आकारले आहेत असा निष्कर्ष काढला व संबंधित डॉक्टरांना याबाबत सांगितले. पण तरीही बिल भरण्यासाठी कुणाल पवार हॉस्पिटल अकाऊंटंटकडे गेले असता पेशंटच्या अज्ञानाचा पुरेपूर फायदा घेत फक्त 26000/- रुपये कमी होतील असे सांगण्यात आले. मला असे कळताच अमोल  हॉस्पिटलमध्ये गेले असता कळले दरम्यानच्या वेळेत अकाऊंटंट साहेब पुन्हा मेहेरबान झाले व आता ते 45000 /- रुपये कमी होतील तसेच यापेक्षा एक रुपया देखील कमी घेणारच नाही याबाबत ते ठाम पणे सांगितले. हे बिल शासकीय नियमानुसार असल्याची पुष्टीही त्यांनी जोडली. अखेर डॉक्टरांना परत कॉल केला व हा सर्व प्रकार सांगत नाराजी व्यक्त केली . डॉक्टरांनी कॉल करून अकाऊंटंटला समज दिली व शासकीय ऑडिटर यांनी काढलेलेच बिल घेण्याचे सांगितले. कुणाल पवार यांनी शासकीय नियमानुसार देय असलेले 81500/- रुपये इतकेच उर्वरित बिल हॉस्पिटलमध्ये भरले. कुणाल पवार व त्यांचे समस्त कुटुंबीयांनी अमोल कोल्हे यांचे आभार मानले व आनंदाने घरी रवाना झाले .

अमोल कोल्हे यांनी देखील पेशंटकडून योग्य बिल घेतल्याबद्दल डॉक्टर चौधरी व शासकीय कर्तव्य चोख बजावल्याबद्दल प्रतीक हमीरकर यांचे आभार मानले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here