हिंगणघाट येथे 10 बेडचे कोविड रुग्णालयाला मंजुरी.

✒प्रा. अक्षय पेटकर,प्रतिनिधी✒
हिंगणघाट,दि.18 एप्रिल:- वर्धा जिल्हात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा प्रधुर्भाव वाढत असतांना हिंगणघाट येथे कोविड हॉस्पिटलची मंजुरी दिली जावी असी मागणी वर्धा जिल्हाधिकारी यांचेकडे माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी केली होती. त्या मागणीचा सतत पाठपुरावा करून आज या मागणीला मंजुरी प्राप्त झाली असून आता दहा कोरोना वायरस बांधीत रुग्णांचा इलाज डॉक्टर मरोठी रुग्णालय हिंगणघाट येथे केला जाणार आहे.आज या कोविड सेंटरची मंजुरी प्राप्त झाली आहे.
माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांच्या प्रयत्नाने आज हिंगणघाट शहरांमध्ये हे 10 बेडचे कोरोना रुग्णालय सुरु होणार आहे. या रुग्णालयाला मंजुरी प्राप्त करण्याकरिता पालकमंत्री सुनील केदार अप्पर जिल्हाधिकारी अशोक लटारे, आर डी सि मोरे (मॅडम), जिल्हा शल्यचिकिसक तडस तसेच हिंगणघाटचे उपजिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर चाचरकर यांनी मोलाचे सहकार्य केले. या रुग्णालयात हिंगणघाट येथील डॉक्टर मरोठी, डॉक्टर मानधनिया, डॉक्टर गमे, डॉक्टर सौ. मानधनिया आणी इतर कर्मचारी काम करणार आहे. या हॉस्पिटलच्या मंजुरीने परिसरातील जनतेला मोठा दिलासा मिळणार असे माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी व्यक्त केले आहे.