हिंगणघाट तालुक्यातील गांगापुर येथे स्मशानभूमीच नाही, गांगापुरची स्मशानभूमी कधी होणार?

63

प्रा. अक्षय पेटकर,प्रतिनिधी✒
हिंगणघाट:- तालुक्यातील गांगापुर येथे मस्मशानभूमीच नाही. गेले 25 ते 30 वर्षा पासून रस्त्यावर कडेला अग्नी देतात, गावालाच लागून असलेले शेत नरेश हाते यांच्या शेतातच्या बाजूला अग्नी देतात, माणूस मरतो पण त्याला जागाच नाही कधी येणार मशानभुमी गावात सध्या चर्चा चालू आहे. ग्राम पंचायत तर्फे स्मशानभूमी लागून आली पण शेतकरी जागा दयायला तयार नाही. सध्या हा विषय गावात चर्चा चालू आहे.

शासनाने स्मशानभूमी साठी जागा दयायला पाहिजे त्या ठिकाणी हैण्डपंप व्यवस्था नाही, बसण्यासाठी खुर्चीची व्यवस्था नाही, लाईटची सुद्धा व्यवस्था नाही, ग्रामपंचायत भिवापुर तर्फे कोणताही लाभ गांगापुर गावाला मिळत नाही. लवकरात लवकर शासनाच्या स्मशानभुमी योजनेच्या गावाला लाभ मिळावा, लोकांना प्रेत जाळण्यासाठी भर उन्हात तासनतास उभे राहावे लागते, रस्त्यावर प्रेत जाळण्यात येते, गेले कित्येक वर्षा पासून हे असच सुरु आहे. शासन व ग्रामपंचायत भिवापुर तर्फे गांगापुर गावाकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. गावातील नागरिक यांची मागणी आहे, स्मशानभूमीच काम त्वरित चालू करा आणि गंगापुर गावाला स्वताःची एक स्वतंत्र स्मशानभुमी मिळाली पाहिजे अशी मागणी करीत आहेत.