पुलगाव येथे जंबो कोविड रुग्णालयाच्या उभारणीबाबत वंचित बहुजन आघाडीचे मुख्यमंत्राना निवेदन.

51

प्रशांत जगताप, प्रतिनिधी✒
पुलगाव/नाचणगाव,दि.19 एप्रिल: वर्धा जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. यातच पुलगाव आणि नाचणगाव तालुक्यात कोरोनाने थैमान घातलेले आहे. रोज अनेक कोरोना वायरस बाधीत रुग्ण समोर येत आहे. पुलगाव आणि नाचणगाव परीसरातील लोकांचा मनात भीतीचे वातावरण निर्माण झाल आहे. पुलगाव आणि नाचणगाव तालुका वर्धा जिल्ह्यात हॉटस्पॉट ठरलेला आहे. अशा परिस्थितीत पुलगाव आणि नाचणगाव येथे हवी ती आरोग्य व्यवस्था उपलब्ध नसल्याने, वंचित बहुजन आघाडी पुलगाव चे महासचिव अमोल कोल्हे यांनी पुलगाव येथे जम्बो कोविड सेंटर उभारण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडे निवेदनात केली होती.

वंचित बहुजन आघाडी पुलगावचे महासचिव अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य शासन मुंबई यांना नाचणगांव, पुलगाव व ग्रामीण भागात वाढत असलेल्या कोविड -19 चे संक्रमित कोरोना वायरस बाधीत रुग्ण संख्येला पाहता अत्याधुनिक कोविड केन्द्राची मागणी केली आहे. या बाबतीत त्यांचे म्हणणे आहे की वाढत्या बाधीत रुग्ण संख्येला पाहता पुलगाव ग्रामीण रुग्णालयात खाटा व कर्मचारी वर्ग अपूर्वा पडत आहे. कोविड – 19 चे रूग्णासाठी आवश्यक प्राणवायू साठा व अतिदक्षता विभाग नाही. म्हणून रूग्णांना जिल्हा रुग्णालय, सावंगी व सेवाग्राम येथे पाठविण्यात येते. यात वेळ वाया जातो. करिता पुलगाव -देवळी येथे कोविड – 19 केन्द्र उभारण्यात यावे. त्या साठी आज आम्ही निवेदनातून मुख्यमंत्री यांना मागणी करतो, की लवकरात लवकर सोई उपलब्ध करून जन सामान्य नागरिकाच्या जिव वाचवा अशी मागणी करण्यात आली.