वर्धा जिल्हात कोरोना बाधित रुग्णाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या.
वर्धा जिल्हात कोरोना बाधित रुग्णाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या.

वर्धा जिल्हात कोरोना बाधित रुग्णाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या.

क्रेनच्या सहाय्याने विहिरीतून बाहेर काढला कोरोना बाधित रूग्णाचा मृतदेह.

वर्धा जिल्हात कोरोना बाधित रुग्णाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या.
वर्धा जिल्हात कोरोना बाधित रुग्णाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या.

✒आशीष अंबादे, प्रतिनिधी ✒
वर्धा,दि.19 एप्रिल:- वर्धा जिल्हातील आर्वी येथिल उपजिल्हा रूग्णालयातून पळ काढणा-या कोरोना वायरस बाधित रूग्णाचा मृतदेह विहिरीत आढळून आला होता. त्या कोरोना बाधित रुग्णाचा मृतदेह सोमवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास क्रेनच्या सहाय्याने विहिरीतून काढण्यात आला आहे. यानंतर या कोरोना वायरस बाधीत रुग्णांवर कोरोना योद्धांनी मृतदेहावर स्थानिक मोक्षधामात विधीवत अंत्यसंस्कार करण्यात आला.

आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोना वायरस बाधित रुग्ण पळून गेला होता. त्यानंतर त्याचा शोध घेतला असता त्याने विहिरीत आत्महत्या केल्याचे उघडकीस आल्याने शहरात एकच खळबळ उडाली होती. ही घटना रविवारी उघडकीस आली होती. विजय उत्तम खोडे रा. बोरगाव असे आत्महत्या केलेल्या कोरोना वायरस बांधीत रुग्णांचे नाव असुन. 14 एप्रिल रोजी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्याला आष्टी वरून आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले हाेते. त्याच्यावर उपचार सुरू होते. मोठ्या भावाने त्याची भेटही घेतली होती. मात्र, शनिवारी मध्यरात्रीनंतर विजय खोडे याने रूग्णालयातून पळ काढला होता. मृताच्या भावाने ओळख पटविली असता विहिरीतून मृतदेह काढण्यास तयारी करण्यात आली. पाण्याचा उपसा करणारी मोटर आणून विहिरीतील पाण्याचा उपसा सुरू केला होता. पण विहिरीला पाणीच पाणी असल्याने व कपारीत मृतदेह अडकला होता. सोमवारी क्रेनच्या साहायाने पलंग बांधून एकाला विहिरीत उतरवून मृतदेह काढण्यात आला. यात पोलिसांना खुप दमछक करावी लागली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here