दहावी बोर्डाची परीक्षा रद्द, बारावीची परीक्षा होणार, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
दहावी बोर्डाची परीक्षा रद्द, बारावीची परीक्षा होणार, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

दहावी बोर्डाची परीक्षा रद्द, बारावीची परीक्षा होणार, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय.

नीलम खरात, मुंबई प्रतिनिधी

मुंबई:- सीबीएसई आणि आयसीएसई प्रमाणं दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. देशातील सात राज्यांमध्ये परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या आधी सीबीएसई आणि आयसीएसईच्या दहावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. राज्यातही दहावीची विद्यार्थ्यांच्या पालकांनी परीक्षा रद्द करण्याची मागणी केली होती.  सीबीएसई आणि आयसीएसईच्या धर्तीवर महाराष्ट्रातही दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झाला आहे. बारावीच्या परीक्षा होतील, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली. 

‘‘दहावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झाला असला, तरी अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात पाठविले जाईल. दहावीत जास्त गुणांची अपेक्षा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा कशी घ्यायची, तसेच बारावीच्या परीक्षा कधी आणि कशा पद्धतीने घ्यायच्या याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल,’’ अशी माहिती राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव आणि मंत्रीमंडळात झालेल्या निर्णयाबाबत पत्रकारांशी बोलताना ‘दहावीच्या परीक्षा रद्द आणि बारावीच्या परीक्षा होतील’, असा निर्णय जाहीर केला. त्यानंतर गायकवाड यांनी ही माहिती दिली. 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here