वर्धेत मोठ्या प्रमाणात बैंक कर्मचारी कोरोना बाधीत. 6 बैंका बंद.
वर्धेत मोठ्या प्रमाणात बैंक कर्मचारी कोरोना बाधीत. 6 बैंका बंद.

वर्धेत मोठ्या प्रमाणात बैंक कर्मचारी कोरोना बाधीत, 6 बैंका बंद.

वर्धेत मोठ्या प्रमाणात बैंक कर्मचारी कोरोना बाधीत. 6 बैंका बंद.
वर्धेत मोठ्या प्रमाणात बैंक कर्मचारी कोरोना बाधीत. 6 बैंका बंद.

आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
वर्धा, दि.21:- वर्धा जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला असून गर्दीची ठिकाणे असलेल्या बँकानाही घेरले आहे. त्यामुळे वर्धा जिल्ह्यातील विविध सहा बैंकातील 80 कर्मचारी कोरोनाबाधित आढळून आल्याने शहरातील सहा बैंकांचे व्यवहार ठप्प असून काही काळासाठी बंद करण्यात आल्या आहेत.

सर्वसामान्य, मध्यमवर्गीय यांच्यासह सर्वच वर्गातील नागरिक बैंकेत दैनंदिन व्यवहार करतात. कोणाला रोख रक्कम काढायची असते तर कोणी रोख रक्कम भरण्यासाठी जाते. व्यापारी, व्यावसायिक, दुकानदार, पेन्शनधारक, कर्मचारी, महिला, शेतकरी, मजूरदार या सर्वांची नियमित बँकेत रेलचेल असते. अनेकजण धनादेशाद्वारे नियमित बैंकेतील व्यवहार करतात. सध्या कोरोनाचा ससंर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत असून गर्दी असलेली ठिकाणे कोरोनाचा हाँटस्पाँट बनत आहेत. बैंकेत रोजच ग्राहकांच्या देणे-घेण करण्यासाठी रांगा लागलेल्या असतात. त्यामुळे अशा ठिकाणाहून कोरोना संसर्ग वाढण्याची अधिक भीती आहे. जिल्ह्यातील सरकारी आणि खासगी या विविध बँकात एकूण 1000कर्मचारी कार्यरत आहेत. त्यापैकी सध्या 80 कर्मचारी कोरोनाबाधित झाले असून त्यांच्यावर विविध ठिकाणी उपचार सुरू आहे. तर आतापर्यंत जिल्ह्यात विविध बैंकेतील 200 कर्मचा-यांना कोरोनाची लागण झालेली आहे. शहरातील सहा बैंकेच्या शाखा कोविडमुळे बंद कराव्या लागल्याने ग्राहकांचीही पंचाईत झाली आहे.

700 कर्मचारी लसीकरणाविना:- वर्धा जिल्ह्यातील एकूण 1000 कर्मचा-यांपैकी आजपर्यंत 45 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या 275 कर्मचा-यांचे कोरोना लसीकरण करण्यात आले आहे. तर 45पेक्षा कमी वय असलेल्या 700 बैंक कर्मचा-यांना अद्यापही

सध्या बंद असलेल्या बँका:- भारतीय स्टेट बैंक, शिवाजी चौक वर्धा, भारतीय स्टेट बैंक ट्रेझरी शाखा वर्धा, बैंक आँफ बरोदा वर्धा, व्हीकेजीबी बैंक वर्धा, एचडीएफसी बैंक वर्धा, सिंडिकेट बैंक वर्धा या 6 बैंकातील कर्मचारी कोरोनाबाधित आढळून आहेत. त्यामुळे सदर बैंका काही कालावधीसाठी बंद करण्यात आल्या आहेत.

बँक बाधित कर्मचारी:- भारतीय स्टेट बैंक, शिवाजी चौक 6, भारतीय स्टेट बैंक ट्रेझरी शाखा 4, बैंक आँफ बरोदा 5, व्हीकेजीबी बैंक 2, एचडीएफसी बैंक 8, सिंडिकेट बैंक 2 याप्रमाणे वर्धा शहरातील 6 बैंकेतील 25 कर्मचारी तर ग्रामीण भागातील मिळून असे एकूण 80 कर्मचारी आजघडीला कोरोनाबाधित आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here